टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाहीच! बीसीसीआने केले जाहीर; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया..

टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाहीच! बीसीसीआने केले जाहीर; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया..

Champions Trophy in Pakistan : पाकिस्तानात पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धांबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबतचा निर्णय आयसीसीला कळवला आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे केंद्र सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, आम्ही हायब्रीड मॉडेलची कोणतीही तयारी केलेली नाही. हा प्रस्ताव आम्ही मान्य करण्याच्या स्थितीत नाही. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात आला होता. परंतु, तरीही टीम इंडिया पाकिस्तानात येऊन खेळण्यास तयार नाही असे नक्वी यांनी सांगितले. त्यामुळे आता भारतीय संघाचे सामने कुठे होणार, पाकिस्तानने जर या सामन्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली नाही तर आयसीसी पुढाकार घेणार का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीत ट्विस्ट! हायब्रीड मॉडेलच्या अफवा, पाकिस्तान बोर्डाचा मोठा खुलासा

आठ संघात होणार १५ सामने

चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या स्पर्धांची सुरुवात १९ फेब्रुवारील होईल. अंतिम सामना ९ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडिया द एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार आयसीसीचे एक पथक १० ते १२ नोव्हेंबरपर्यंत लाहोरला पोहोचेल. या पथकाकडून स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. याच दरम्यान ११ नोव्हेंबरला वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

शेड्युलनुसार ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांग्लादेश हे चार संघ असू शकतात. ग्रुप बी मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान असू शकतात. टूर्नामेंट १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या दरम्यान होईल. या स्पर्धेत ८ संघ आणि एकूण १५ सामने होतील. हे सर्व सामने पाकिस्तानातील लाहोर, कराची आणि रावळपिंडी या शहरांत होतील.

टीम इंडियाचा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव; टी २० मध्ये सलग अकरावा विजय

दुबई किंवा शारजाहमध्ये सामने

पाकिस्तान दौऱ्यात सर्वात मोठा मुद्दा सुरक्षिततेचा आहे. याच कारणामुळे भारत सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात येऊन खेळण्याची परवानगी दिलेली नाही. आता हायब्रीड मॉडेलवर भारतीय संघाचे सर्व सामने दुबई किंवा शारजाहमध्ये आयोजित केले जाऊ शकतात. परंतु, अशी व्यवस्था करण्यास पाकिस्तान बोर्डाने नकार दिला तर कोण सामने आयोजित करणार हा प्रश्न आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube