चॅम्पियन्स ट्रॉफीत ट्विस्ट! हायब्रीड मॉडेलच्या अफवा, पाकिस्तान बोर्डाचा मोठा खुलासा
Champions Trophy 2025 Schedule : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुढील वर्षात पाकिस्तानात (Champions Trophy 2025 Schedule) होणार आहे. मात्र, या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार (Team India) नाही आणि पाकिस्तान या स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यास राजी झाला आहे अशा बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket) यावर प्रतिक्रिया दिली आहे. पीसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा कोणत्याही हायब्रीड मॉडेलचा विचार केला जात नाही असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी सांगितले की काही लोक सूत्रांचा दावा करत काहीही कपोलकल्पित गोष्टी सांगत आहेत. व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीही लिहिलं जात आहे. आम्ही आतापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आमची भूमिका आधी जी होती तीच आताही आहे. याबाबत आज तकने वृत्त दिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अजूनही भारतीय संघाला परवानगी दिलेली नाही. या संदर्भात बीसीसीआयचे अधिकारी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहेत.
Team India : हार्दिक पांड्याला पुन्हा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार
खरं तर पीटीआयच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड पद्धतीने खेळवण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तयार झाले आहे. भारताचे सर्व सामने युएईतील दुबई किंवा शारजाह मध्ये होतील असे यामध्ये म्हटले होते. परंतु, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अशा शक्यता सध्या तरी फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात याबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आठ संघात होणार १५ सामने
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या स्पर्धांची सुरुवात १९ फेब्रुवारील होईल. अंतिम सामना ९ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडिया द एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार आयसीसीचे एक पथक १० ते १२ नोव्हेंबरपर्यंत लाहोरला पोहोचेल. या पथकाकडून स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. याच दरम्यान ११ नोव्हेंबरला वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
शेड्युलनुसार ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांग्लादेश हे चार संघ असू शकतात. ग्रुप बी मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान असू शकतात. टूर्नामेंट १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या दरम्यान होईल. या स्पर्धेत ८ संघ आणि एकूण १५ सामने होतील. हे सर्व सामने पाकिस्तानातील लाहोर, कराची आणि रावळपिंडी या शहरांत होतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ODI आणि टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; कर्णधार गुलदस्त्यात