Women’s T20 World Cup 2024 : महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. (T20 World ) संयुक्त अरब अमिराती आणि शाहजाह येथे ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान सामने खेळले जाणार आहेत. सहावेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर (अ) गटात २०२०च्या उपविजेत्या भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचं आव्हान असणार आहे.
T20 World Cup 2024 : सूर्यकुमार यादव पुन्हा फ्लॉप! खराब कामगिरीने चाहते निराश
फायलन दुबईत
श्रीलंका आणि स्कॉटलंड हे आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल झाले आहेत. प्रत्येक संघ गटात चार सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. १७ व १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. २० ऑक्टोबरला फायलन दुबईत होईल आणि उपांत्य फेरी व अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहेत.
भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास ते(Semi-final 1)मध्ये खेळतील. एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने होणार आहेत. (ब) गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, २०१६चा चॅम्पियन वेस्ट इंडिज, बांगलादेश व स्कॉटलंड हे समोरासमोर असतील. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपद जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
मोठी बातमी! टी 20 वर्ल्डकपचं वेळापत्रक चेंज, भारताच्या सामन्यात बदल; बांग्लादेशची संधी हुकलीच..
भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष
(यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया ( यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन
राखीव खेळाडू – उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर
🚨 NEWS 🚨
Presenting #TeamIndia's squad for the ICC Women's T20 World Cup 2024 🙌 #T20WorldCup pic.twitter.com/KetQXVsVLX
— BCCI Women (@BCCIWomen) August 27, 2024