बांग्लादेशातील हिंसाचारानंतर आयसीसीचा मोठा निर्णय : टी-20 वर्ल्ड कपचा थरार आता ‘या’ देशात रंगणार

  • Written By: Published:
बांग्लादेशातील हिंसाचारानंतर आयसीसीचा मोठा निर्णय : टी-20 वर्ल्ड कपचा थरार आता ‘या’ देशात रंगणार

Women’s T20 World Cup 2024 : बांग्लादेशमध्ये (Bangladesh) राजकीय उलथापालथ झाली आहे. सध्या येथे अंतरिम सरकार स्थापन झालेले आहे. पण येथे होत असलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर Womens T20 World Cup 2024 चे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचे ठिकाण बदलण्याचा मोठा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) घेतलाय. ही स्पर्धा भारत किंवा श्रीलंकेत खेळविले जाईल, अशी शक्यता होती. परंतु ही शक्यता संपुष्टात आली आहे. ही स्पर्धा आता संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये खेळविली जाणार आहे. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. दुबई आणि शारजा या दोन ठिकाणी सामने होणार आहे. सामन्याचे ठिकाण बदलले असले तरी बांग्लादेश क्रिकेट बोर्डचे ही स्पर्धा आयोजित करणार आहे.


धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची ‘लॉटरी’; रायगडमध्ये भाजपची ताकद वाढली !

आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ एलार्डिस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. बांग्लादेशमध्ये महिला टी20 वर्ल्ड कप आयोजन करू शकत नाही. ही लाजिरवाणीबाब आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून आयोजनाबाबत तयारी करण्यात आली आहे. ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये कशी घेता येईल, याबाबत अनेक पर्याय शोधण्याचा प्रयत्न झाला. परंतु ही स्पर्धा आता दुसरीकडे भरवली जाणार आहे. त्यासाठी यूएईचा पर्याय अंतिम करण्यात आला आहे. या स्पर्धेचे आयोजक बांग्लादेश क्रिकेट बोर्डच असणार आहे. भविष्यात आसीसीकडून बांग्लादेशमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतील. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सोळा संघ सहभागी आहेत.

Badlapur : आंदोलक बदलापुरचे नाहीत, ही राजकीय स्टंटबाजीच; भाजप आमदाराने लावला शोध

बांग्लादेशमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहेत. तसेच हिंसाचारामध्ये सातशेहून अधिक नागरीकांचा मृत्यू झालाय. त्या ठिकाणी हिंसेच्या काही घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, स्कॉटलंड या देशांनी आपल्या नागरिकांना बांग्लादेशात जाऊ नये, अशा सूचनाही जारी केल्या आहेत. त्यामुळेही ही स्पर्धा दुसऱ्या देशात भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube