Download App

इंडियन चॅम्पियन संघाचा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, सेमीफायनल होणार की नाही?

सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना पाकशी होणार आहे. हा सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. मात्र, हा सामना खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला.

  • Written By: Last Updated:

WCL IND vs PAK : इंडियन चॅम्पियन संघाने (India Champions) वेस्ट इंडिज चॅम्पियन्सना हरवून वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या (World Championship of Legends) सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी (Pakistan) होणार आहे. हा सामना उद्या (३१ जुलै) रोजी बर्मिंगहॅम येथे खेळला जाणार होता. मात्र, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानसोबत हा सामना खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस दलात खळबळ; खोटं प्रमाणपत्र देऊन शिपाई ते थेट ‘PSI’ पदावर 

मंगळवारी (२९ जुलै) वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघाला हरवून इंडियन चॅम्पियन्स संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. वेळापत्रकानुसार, गुरुवारी (३१ जुलै) इंडियन चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यामध्ये सेमी फायनलची लढत होणार आहे. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास पुन्हा एकदा नकार दिला. यापूर्वी, 20 जुलैला देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार होता, परंतु भारतीय खेळाडूंनी हा सामन्यात खेळण्यास नकार दिला, त्यानंतर सामना रद्द करण्यात आला होता. आता 10 दिवसांनंतर, WCL समोर पुन्हा तीच समस्या निर्माण झाली आहे, आताही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास नकार दिला आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील सध्या सुरू असलेल्या तणावामुळे, टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. इंडियन चॅम्पियन्स संघाचे खेळाडू सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाहीत. त्याचप्रमाणे हरभजन सिंगनेही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता.

जर मोदींनी नाव घेतले तर ट्रम्प सत्य सांगणार; राहुल गाधींचा PM मोदींवर हल्लाबोल 

नकाराचे नेमके कारण काय?
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले, त्याचा परिणाम खेळांवरही झाला. २० जुलै रोजी WCL 2025 च्या लीग सामन्यात भारतीय खेळाडूंनी 20 जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. यानंतर, WCL च्या आयोजकांना सामना रद्द करावा लागला आणि भारतीय चाहत्यांची माफी मागावी लागली.

दरम्यान, आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. WCL चा पहिला सेमीफायनल सामना या दोन्ही संघांमध्ये ३१ जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे होणार आहे मात्र, भारताने नकार दिल्याने हा सामना होणार की नाही? हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. भारतीय संघाने हा सामना खेळला नाही तर पाकिस्तानी संघ न खेळता अंतिम फेरीत पोहोचेल.

तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, WCL सेमीफायनल सामन्यांमध्ये काही बदल करू शकते. दोन्ही सेमीफायनल सामने बर्मिंगहॅममध्ये होतील. दुसरा सेमीफायनल सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, WCL चे आयोजक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना खेळणार नाहीत, त्याऐवजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांत सेमीफायनल सामना खेळतील म्हणजेच भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होऊ शकतो आणि पाकिस्तान हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकतो.

 

 

follow us