जर मोदींनी नाव घेतले तर ट्रम्प सत्य सांगणार; राहुल गाधींचा PM मोदींवर हल्लाबोल

जर मोदींनी नाव घेतले तर ट्रम्प सत्य सांगणार; राहुल गाधींचा PM मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi On PM Modi : लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी लोकसभेत (Lok Sabha) ऑपरेशन सिंदूरवरील (Operation Sindoor) चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा खोटा आहे असं स्पष्टपणे सांगू शकले नाही. अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे नाव घेऊ शकत नाही कारण त्यांना भीती आहे की अमेरिकन अध्यक्ष संपूर्ण सत्य सांगतील. असं माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी मध्यस्थीबाबतचा दावा करण्याच्या बाबतीत अध्यक्ष ट्रम्प यांचे नाव घेतले नाही कारण त्यांना माहित आहे की जर त्यांनी तसे केले तर ट्रम्प संपूर्ण सत्य उघड करतील. असा दावा राहुल गांधी यांनी संसद परिसरात माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरदरम्यान काय घडले हे सर्वांना माहिती आहे. असं देखील राहुल गांधी म्हणाले.

ट्रम्प संपूर्ण सत्य सांगतील: राहुल गांधी

माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प खोटे बोलत आहेत असे म्हटले नाही, काय घडले आहे हे सर्वांना माहिती आहे. मोदी बोलूही शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. जर पंतप्रधान बोलले तर ट्रम्प संपूर्ण सत्य सांगतील म्हणून पंतप्रधान मोदी काहीही बोलत नाही असं राहुल गांधी म्हणाले. तर दुसरीकडे अमेरिकेसोबतच्या व्यापार करारबद्दल राहुल गांधी म्हणाले की, ट्रम्प यांना आमच्यासोबत व्यापार करार हवा आहे. त्यामुळे ट्रम्प मोदींवर दबाव आणतील. तुम्हाला दिसेल की कोणत्या प्रकारे व्यापर केला जात आहे.

कियारा अडवाणीच्या वाढदिवसाचं खास गिफ्ट! यश राज फिल्म्सकडून ‘वॉर 2’ चं पहिलं गाणं ‘आवन जावन’ उद्या होणार रिलीज 

ऑपरेशन सिंदूरवर सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान जगातील कोणत्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची मागणी केलेली नाही असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माझ्या आवाहनानंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबला असल्याचा दावा केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube