World Championship of Legends : ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्यांदा भिडणार भारत – पाकिस्तान; ‘या’ दिवशी होणार सामना

World Championship of Legends :  आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारताने गोल्ड जिंकले आहे.

World Championship Of Legends

World Championship Of Legends

World Championship of Legends :  आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारताने गोल्ड जिंकले आहे. तर आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’ स्पर्धेत एकमेकांशी भिडणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सची सध्या तिसरी आवृत्ती सुरू असून आतापर्यंत या स्पर्धेत चार सामने खेळले गेले आहेत. चारपैकी इंडिया चॅम्पियन्सने दोन सामने खेळले आहेत. इंडिया चॅम्पियन्सने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होते तर दुसऱ्या सामन्यात ‘इंग्लंड चॅम्पियन्स’कडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

तर आता या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. या स्पर्धेत माजी खेळाडूंचा सहभाग असल्याने पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा युवराज (Yuvraj Singh) , इरफान, युसूफ आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) सारखे खेळाडू खेळताना दिसणार आहे. दोन्ही संघांमधील सामना 10 ऑक्टोबर रोजी शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

‘इंडिया चॅम्पियन्स’ विरुद्ध ‘पाकिस्तान चॅम्पियन्स’ सामना कधी ?

‘इंडिया चॅम्पियन्स‘ आणि ‘पाकिस्तान चॅम्पियन्स’ यांच्यातील सामना 10 ऑक्टोबर 2026 रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

‘इंडिया चॅम्पियन्स’ विरुद्ध ‘पाकिस्तान चॅम्पियन्स’ सामना किती वाजता सुरू होईल?

‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स 2026 ‘ मधील ‘इंडिया चॅम्पियन्स’ आणि ‘पाकिस्तान चॅम्पियन्स’ यांच्यातील सामना सायंकाळी 5.00 वाजता (IST) सुरू होईल.  टॉस 4.30 वाजता होईल.

‘इंडिया चॅम्पियन्स’ विरुद्ध ‘पाकिस्तान चॅम्पियन्स’ सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होईल?

‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’चे भारतात ‘स्टार स्पोर्ट्स’ (Star Sports) वर थेट प्रक्षेपण केले जाईल.

 Live Streaming कुठे होईल?

‘इंडिया चॅम्पियन्स’ विरुद्ध ‘पाकिस्तान चॅम्पियन्स’ सामन्याचे थेट प्रवाह (लाइव्ह स्ट्रीमिंग) ‘फॅनकोड’ (FanCode) ॲपवर उपलब्ध असेल.

भारत चॅम्पियन्स संघ

रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, युवराज सिंग, युसूफ पठाण, इरफान पठाण, मोहित शर्मा, धवल कुलकर्णी, वरुण आरोन, हरभजन सिंग, पवन नेगी, पियुष चावला, स्टुअर्ट बिन्नी, ऋषी धवन, अभिमन्यू मिथुन.

ग्राहकांनो, Everest जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरु नका;  FSSAI दिले मोठे आदेश –

पाकिस्तान चॅम्पियन्स

कामरान अकमल, शर्जील खान, मोहम्मद हाफीज, शाहिद आफ्रिदी, आसिफ अली, इफ्तिखार अहमद, उमर अमीन, आसिफ आफ्रिदी, आमेर यामीन, सोहेल तन्वीर, मोहम्मद अमीर, वहाब रियाझ, रुम्मान रईस.

Exit mobile version