AUS vs ENG: गतविजेत्या इंग्लंडचा आणखी एक पराभव झाला आहे. अहमदाबाद येथील मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 33 धावांनी पराभूत केले आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने सलग पाचवा विजय मिळविला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये जागा पक्की मानली जात आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत इंग्लंड कधीच बाहेर पडली आहे. परंतु या पराभवाबरोबर चॅम्पियन ट्रॉफीचे तिकीटही कापले गेले आहे. वर्ल्डकपमधील टॉप आठ संघांना चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यास संधी मिळते.
World Cup 2023 : चारशे धावा करूनही न्यूझीलंड पराभूत, पाकिस्तान सेमीफायनलच्या रेसमध्ये
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 286 धावा केल्या. प्रत्युत्तर इंग्लंड संघ 253 धावांवर ऑलआऊट झाला. सात मॅचमध्ये इंग्लंडचा हा सहाव्या पराभव आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅबुशेनने 71 धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने शानदार गोलंदाजी केली. त्याने 10 ओव्हरमध्ये 21 धावा देत तीन विकेट घेतल्या आहेत.
19 तारखेला एअर इंडियाचे विमान उडवून देणार, शिखांनी प्रवास करू नये; गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. संघाच्या 36 धावांवर ट्रेविस हेड आणि डेविड वॉर्नर हे बाज झाले. त्यानंतर मार्नस लॅबुशेन व स्टीव स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागिदारी केली. त्यानंतर स्मिथ आणि जोश इंग्लिस हे बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाही संकटात सापडली होती. परंतु लॅबुशन आणि कॅमरुन ग्रीनने पाचव्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. कॅमरून ग्रीन आणि मार्कस स्टोइनिसने सहाव्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. शेवटी अॅडम झम्पाने 29 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 280 वर नेली.