Download App

World Cup 2023: विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ जाहीर, तमीम इक्बालला डच्चू

World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरु होत असलेल्या विश्वचषकासाठी बांगलादेशने आपला संघ जाहीर केला आहे. शाकिब अल हसनकडे (Shakib Al Hasan) संघाचे नेतृत्व दिले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासकडे (Liton Das) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी निवृत्तीनंतर परतलेल्या तमीम इक्बालला (Tamim Iqbal) संघात स्थान मिळालेले नाही.

यापूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे तमिम इक्बाल आशिया कपमध्ये खेळू शकला नव्हता. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तमिम इक्बालने दमदार पुनरागमन केले होते. याशिवाय वेगवान गोलंदाज इबादत हुसैनची दुखापतीमुळे निवड झाली नाही.

तमिम इक्बालच्या अनुपस्थितीत बांगलादेशच्या फलंदाजीची मदार मुशफिकुर रहीम, नझमुल हुसैन शंटो, लिटन दास आणि शकीब अल हसन या खेळाडूंवर असेल. तर या संघात शाकिब अल हसन, मेहंदी हसन मिराज, नसुम अहमद आणि मेहंदी हसन हे फिरकीचे पर्याय असतील. तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. याशिवाय शरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि तंजीम हसन यांचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.

World Cup 2023: विश्वचषकापूर्वी श्रीलंकेला धक्का, हसरंगा दुखापतीने टीममधून बाहेर

विश्वचषकासाठी बांगलादेशचा 15 सदस्यीय संघ-
शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, लिटन दास (उपकर्णधार), नजमुल हुसैन शंटो, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, हसन महमूद, नसुम अहमद, मेहंदी हसन, तन्झीम हसन साकीब. तन्झीद हसन तमीम आणि महमुदुल्लाह रियाध

शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना 7 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे होणार आहे.

Tags

follow us