Download App

World Cup 2023 : मिलरचे झुंजार शतक, आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य

  • Written By: Last Updated:

AUS vs SA : वर्ल्डकपमधील (World Cup 2023) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डरमधील चारही फलंदाज संघाच्या 24 धावांवर तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर डेविड मिलरने झुंजार खेळी केली. त्याने शानदार शतकही झळकविले आहे. वर्ल्डकपमधील त्याचे पहिले शतक आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या आहेत. जोश हेजलवुड आणि ट्रेविड हेड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहे. या सामन्यात जिंकणाऱ्या संघ वर्ल्डकपसाठी भारताबरोबर रविवारी झुंजणार आहे.


केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, 450 रुपयांत गॅस, फ्रीमध्ये स्कुटी; BJP च्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीला निर्णय घेतला. परंतु तो आफ्रिकेसाठी चुकीचा ठरला. आफ्रिकेचा संघ 49.4 षटकांत 212 धावांत गारद झाला. आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने 101 धावांची झुंजारपणे खेळी केली. बिकट परिस्थितीत हेन्रिक क्लासने 47 धावांची खेळी केली. कोइत्जेने 19 धावा केल्या. एडन मार्करम व रबाडा वगळ्यात इतर फलंदाजांना दोन अंकी धावा करता आलेल्या नाहीत.

चोकर्सचा शिक्का बसलेल्या दक्षिण आफ्रिकेने या वर्ल्डकपमध्ये दोनदा चारशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. परंतु आजच्या महत्त्वाच्या सामन्यात आफ्रिकेच्या अव्वल फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार तेम्बा बावुमा खातेही उघडू शकला नाही. क्विंटन डिकॉक तीन, रासी वॅन डर डुसें सहा धावांवर बाद झाला. एडन मार्करमही दहा धावांवर बाद झाला. आफ्रिकेचे चार फलंदाज संघाच्या 24 धावसंख्येवर तंबूत परतले होते. त्यामुळे आफ्रिका संघ संकटात सापडला होता. परंतु त्यानंतर हेन्रिक क्लासने संघर्ष करत 47 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 116 झेंडूत झुंजार खेळी करत शतक झळकविले. या शतकात त्याने आठ चौकार आणि पाच जबरदस्त षटकार मारले.

ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज झटपट बाद

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाला पहिला झटका 60 धावसंख्येवर बसला. स्फोटक सुरुवात करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला एडन मार्करमने त्रिफळा उडवत तंबूत परतविले. वॉर्नरने 18 चेंडूत 29 धावा केल्या. त्यात त्याने एक चौकार आणि चार षटकार मारले. त्यानंतर फलंदाजीला आलेला मिचेल मार्श खातेही न उघडताच तंबूत परतला. 61 धावांवर ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज तंबूत परतले. सलामीवीर ट्रेव्हिस हेड 38 धावांवर, तर स्टिव्ह स्मिथ शुन्यावर खेळत आहेत.

Tags

follow us