World Cup : विजयासाठी भारताला इतिहास बदलावा लागणार; आजतागायत कोणत्याच संघाला हे जमलं नाही…

World Cup : विजयासाठी भारताला इतिहास बदलावा लागणार; आजतागायत कोणत्याच संघाला हे जमलं नाही…

World Cup : 2023 च्या वनडे विश्वचषक (World Cup) स्पर्धेतील भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली आहे. लीग टप्प्यातील भारत हा एकमेव संघ ठरलायं ज्याने एकही सामना गमावला नाही. गुणतालिकेतही भारताने अव्वल स्थान पटकावले. आता भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी अवघ्या दोन पावलांवर आहे. भारताचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. भारताला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन व्हायचं असेल तर इतिहास बदलावा लागणार आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

एकदिवसीय विश्वचषकाचे साखळी सामने राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवले गेले आहेत. राऊंड रॉबिन प्रकारात, साखळी टप्प्यात सर्व संघ एकमेकांसमोर येतात आणि गुणतालिकेत अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतात. विश्वचषकाच्या इतिहासात ही तिसरी वेळ होती जेव्हा साखळी सामने राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवले गेले.

आमदार टिंगरेंना लोकायुक्तांचा दणका; केलेल्या कामांचे कोट्यावधी रुपये खिशातून द्यावे लागणार?

क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत राऊंड रॉबिन प्रकारात अव्वल स्थानावर राहून जेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी भारत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे, त्यामुळे चॅम्पियन व्हायचे असेल तर हा इतिहास बदलावा लागणार आहे.

शरद पवारांचा खोटा जातीचा दाखला व्हायरल, रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

एकदिवसीय विश्वचषक प्रथम 1992 मध्ये राऊंड रॉबिन स्वरूपात खेळला गेला. या विश्वचषकात न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता, पण उपांत्य फेरीतील सामना हरला आणि स्पर्धेबाहेर पडला. त्याच वेळी, 2019 विश्वचषक देखील राऊंड रॉबिन स्वरूपात खेळला गेला. या विश्वचषकात भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. पण सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन भारतीय संघ बाहेर पडला.

Tiger 3: ‘या’ अभिनेत्यांनी प्रेक्षकांना YRFच्या स्पॉयलर उघड न करण्याचे केले आवाहन

टीम इंडियाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळीही न्यूझीलंडचा सामना भारताशी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण 117 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 59 सामने जिंकले असून न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत.

दरम्यान, सात सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत राहिला. त्याचबरोबर, एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये 10 सामने झाले आहेत. यापैकी किवी संघाने 5 सामने जिंकले असून भारताने 4 सामने जिंकले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube