Download App

World Cup 2023 : वॉर्नर चिडला! अंपायवरच भडकला; त्यावेळी नेमकं काय घडलं ?

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर (World Cup 2023) तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सूर गवसला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा (Australia) दणदणीत पराभव केला. श्रीलंकेने दिलेले 210 धावांचे टार्गेट ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहज पार केले. मात्र, या सामन्यात असा एक प्रसंग घडला ज्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये दिलशान मदुशंकाच्या चेंडूवर अंपायर जोएल विल्सन यांनी डेव्हिड वॉर्नरला (David Warner) एलबीडब्ल्यू बाद घोषित केले. डीआरएसमध्ये ऑनफिल्ड कॉलमुळे रिव्ह्यू झाला पण तरीही वॉर्नरला माघारी जावे लागले.    

World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया जिंकली अन् स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की टळली

स्क्रीनवर ऑनफिल्ड कॉल येताच वॉर्नर अंपायरवर चिडला. सुरुवातीला त्याने रागाच्या भरात हातातील बॅट पॅडवर जोरात मारली. त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जात असतान अंपायरच्या दिशेने जोरात ओरडला. दिलशान मदुशंकाच्या चेंडून जास्त उसळी घेतली नव्हती. त्यामुळे आपण बाद नाही असे वॉर्नरला वाटत होते. मात्र, अंपायरने त्याला आऊट दिले. या प्रकारानंतर वॉर्नर चांगलाच संतापल्याचे दिसून आले.  त्यानंतर त्याने जे काही केले ते कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या प्रकारानंतर डेव्हिड वॉर्नरवर कारवाई होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला खेळण्यास बंदी घातली गेली नाही तरी मॅच फीमधील काही रक्कम दंड म्हणून नक्कीच कपात केली जाऊ शकते. या प्रकरणात आता काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान कायम

लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकच्या 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. ऑस्ट्रेलियाने श्रीलंका संघाचा विश्वचषकातील सलग तिसरा पराभव करून 5 विकेट्सनी मात केली. कांगारू संघाच्या पहिल्या विजयात फलंदाज जोश इंग्लिस आणि मिचेल मार्श आणि गोलंदाज अॅडम झम्पा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लिशने 5 चौकार आणि 1 षटकारासह 58 तर मार्शने 9 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. दरम्यान, श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने सर्वाधिक 3 बळी घेतले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत सर्वबाद 209 धावांवर आटोपला. सलामीवीर कुसल परेराने 12 चौकारांसह 78 (82 चेंडू) आणि पथुम निसांकाने 8 चौकारांच्या मदतीने 61 (67 चेंडू) धावा केल्या. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने 4 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 35.2 षटकांत 5 गडी राखून विजय मिळवला.

Tags

follow us