World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया जिंकली अन् स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की टळली

World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया जिंकली अन् स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की टळली

World Cup 2023 : लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकच्या 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. ऑस्ट्रेलियाने श्रीलंका संघाचा विश्वचषकातील सलग तिसरा पराभव करून 5 विकेट्सनी मात केली. कांगारू संघाच्या पहिल्या विजयात फलंदाज जोश इंग्लिस आणि मिचेल मार्श आणि गोलंदाज अॅडम झम्पा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लिशने 5 चौकार आणि 1 षटकारासह 58 तर मार्शने 9 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. दरम्यान, श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने सर्वाधिक 3 बळी घेतले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत सर्वबाद 209 धावांवर आटोपला. सलामीवीर कुसल परेराने 12 चौकारांसह 78 (82 चेंडू) आणि पथुम निसांकाने 8 चौकारांच्या मदतीने 61 (67 चेंडू) धावा केल्या. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने 4 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 35.2 षटकांत 5 गडी राखून विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करता आली नाही. चौथ्या षटकातच संघाने दोन विकेट गमावल्या. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरच्या (11) रूपाने संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ खाते न उघडता तंबूत परतला. दिलशान मदुशंकाने दोन्ही फलंदाजांना एलबीडब्ल्यू करून आपली शिकार बनवले.

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘गडकरी’चा ट्रेलर लाँच, नितीन गडकरींचा जीवनप्रवास उलगडणार

दरम्यान, सलामीवीर मिचेल मार्शने डाव सांभाळला. मात्र, 15व्या षटकात मार्शने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 51 चेंडूत 9 चौकारांसह 52 धावांची खेळी खेळली. मार्शने चौथ्या क्रमांकावर आलेल्या मार्नस लॅबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 56 (62 चेंडू) धावांची भागीदारीही केली.

मार्शच्या विकेटनंतर, जोस इंग्लिससह लॅबुशेनने डाव पुढे नेला आणि दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची (86 चेंडू) भागीदारी झाली. पण ही भागीदारी 29 व्या षटकात 40 धावा (60 चेंडू) केल्यानंतर दिलशान मदुशंकाच्या जाळ्यात अडकलेल्या लॅबुशेनच्या विकेटने संपुष्टात आली.

समलिंगी विवाहाला मान्यता मिळेल का? सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी

यानंतर ऑस्ट्रेलियाला 34 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाचवा धक्का बसला जोस इंग्लिसच्या रूपाने, जो चांगली खेळी खेळत होता, तो फिरकीपटू ड्युनिथ वेल्लालाघेच्या जाळ्यात अडकला आणि त्याने 58 (59) धावा केल्या. 5 चौकार आणि 1 षटकार मारले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांनी नाबाद राहताना ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेल 31* धावांवर नाबाद परतला आणि स्टॉइनिस 20* धावांवर नाबाद परतला.

अशी होती श्रीलंकेची गोलंदाजी
श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने सर्वाधिक 3 बळी घेतले. यादरम्यान त्याने 9 षटकात 38 धावा दिल्या. याशिवाय दुनिथ वेल्लालेगाला 1 विकेट मिळाली. इतर एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube