Download App

World Cup 2023 : टीम इंडियाला पहिला धक्का! तुफानी खेळीनंतर रोहित बाद

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनल सामन्याला सुरुवात झाली (World Cup 2023) आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली आहे. रोहित शर्माने सुरुवातीलाच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू आहे. पहिल्या सहा ओव्हर्समध्येच भारताचे 58 रन झाले असून रोहित शर्मा अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. त्याच्या साथीला शुभमन गिलही जोरदार फलंदाजी करत आहे.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्यात घातपाताच्या धमकीने खळबळ; बंदोबस्तात वाढ

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरोधात न्यूझीलँडच्या संघाने नेहमीच सरस कामगिरी केली आहे. दोन्ही संघांत विश्वचषकात आतापर्यंत दहा सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलँडने 5 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने चार सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. मागील 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली होती. मात्र सेमीफायनलमध्ये न्यूझीलँडचा पराभव करत टीम इंडियाचा (Team India) विजयी रथ रोखला होता.

रोहित शर्माचे अर्धशतक हुकले 

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही फलंदाजांनी वेगवान खेळ सुरू केला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित शर्माने चौकार आणि षटकार ठोकत धावा केल्या. वेगवान खेळ करत रोहित शर्माने अर्धशतकही पूर्ण करण्याच्या वाटेवर असतानाच टीम साउदीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झाला. सामन्यातील पहिल्या 8 ओव्हर्स झाल्यानंतर भारतीय संघाच्या 71 धावा पूर्ण झाल्या होत्या.

भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, शमी, सिराज.

न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिन कॉन्वे, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट.

Tags

follow us