Download App

World Cup 2023 : भारत-पाक सामन्यात ‘बॉलिवूड’चा जलवा; खास सिंगर्स करणार परफॉर्मन्स!

World Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानातील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आज विश्वचषकात (World Cup 2023) भिडणार आहेत. या विश्वचषकातील भारत-पाकिस्तानचा हा पहिलाच सामना आहे. परंतु, या सामन्याचा थरार आतापासूनच जाणवायला लागला आहे. क्रिकेटच्या या युद्धात कोण बाजी मारणार, हे आताच सांगता येणे कठीण आहे. सामन्याची तयारी पूर्ण झाली असून आज (शनिवार) दुपारी 2 वाजल्यापासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरू होत आहे.

विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर पाकिस्तानने (Pakistan) भारताचा एकदाही पराभव केलेला नाही. प्रत्येक सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानला धूळ चारली आहे. आताही टीम इंडिया जिंकण्याच्याच इराद्याने मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयनेही या सामन्यासाठी खास तयारी केली आहे. बॉलिवूडमधील अनेक गायक सामन्याआधी परफॉर्मन्स करणार आहेत.

World Cup 2023 : पराभव ऑस्ट्रेलियाचा पण, धक्का टीम इंडियाला; आफ्रिकेने केला मोठा उलटफेर

हा सामना 2 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी म्हणजेच 12.30 वाजल्यापासून बॉलिवूड सिंगर्स आपल्या सुरेल आवाजाचे दर्शन घडविणार आहेत. या कार्यक्रमालाच वर्ल्डकप स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी देखील म्हटले जात आहे. बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार या सामन्याआधी शंकर महादेवन, अरिजीत सिंह, सुनिधी चौहान, सुखविंदर सिंह खास परफॉर्मन्स देणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील तीन गोल्डन तिकीटधारक सचिन तेंडुलकर, रजनीकांत आणि अमिताभ बच्चनही हा सामना पाहण्यासाठी येतील. स्टेडियममधील प्रेक्षकांना पाण्याच्या बाटल्या मोफत देण्यात येणार आहेत. याचा खर्च बीसीसीआय स्वतः करणार आहे.

भारत-पाकिस्तान पहिल्यांदा कधी भिडले ?

भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासावर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये पहिला सामना 1952 मध्ये झाला होता. हा कसोटी सामना होता. पहिला एकदिवसीय सामना 1978 मध्ये क्वेटा येथे खेळला गेला होता. भारताने पहिली कसोटी आणि वनडे दोन्ही जिंकले. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध पहिली कसोटी खेळली. दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 372 धावा केल्या होत्या. यादरम्यान विजय हजारेने 76 धावा केल्या होत्या. विजय मांजरेकरने 23 धावांचे योगदान दिले होते. हेमू अधिकारीने नाबाद 81 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 150 आणि दुसऱ्या डावात 152 धावा करत सर्वबाद झाला.

World cup 2023 : भारत-पाक सामन्यापूर्वी शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’

Tags

follow us