Download App

World Cup 2023 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा, श्रेयस अय्यरची धुव्वाधार खेळी

  • Written By: Last Updated:

IND vs PAK : वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला आहे. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात 192 धावांचे लक्ष्य भारताने 30. 3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची मोठी खेळी केली आहे. तर श्रेयस अय्यर नाबाद 53 धावा करत भारताला विजय मिळवून दिला आहे.

कुलदीप, जडेजा, सिराज, बुमराह आणि हार्दिकच्या घातक गोलंदाजीनंतर रोहित शर्माच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारताने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानचा 117 चेंडूंत 7 गडी राखून पराभव केला. एकदिवसीय विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग आठवा विजय आहे. त्यामुळे भारताला विश्वचषकात पराभूत करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकले नाही.

रोहित शर्माने षटकारांचा इतिहास रचला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा मानकरी

फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा डाव अवघ्या 191 धावांत गुंडाळला. यानंतर अहमदाबादमध्ये रोहित शर्माचे तुफान आले. रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हिटमॅनने अवघ्या 63 चेंडूत 86 धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याचे शतक हुकले. यादरम्यान भारतीय कर्णधाराने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. 2023 च्या विश्वचषकात भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.
टीम इंडियाला चिअर करण्यासाठी पोहोचल्या अनुष्का-रितिका आणि रिवाबा, उर्वशीचा ग्लॅमर तडका

तत्पूर्वी, पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी तुफानी सुरुवात करून दिली. गिल 11 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 16 धावा करून बाद झाला. शाहीन आफ्रिदीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर किंग कोहली आणि रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांना झोडपून काढले. मात्र, तीन चौकारांच्या मदतीने 18 धावा करून कोहली बाद झाला.

गिल आणि कोहली बाद झाल्यानंतरही रोहितने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवली आणि मैदानाच्या चारही दिशांना मोठे फटके मारले. यादरम्यान रोहितने वनडेमध्ये 300 षटकारही पूर्ण केले. मात्र, रोहितला शतक झळकावता आले नाही. शाहीन आफ्रिदीने रोहितला वैयक्तिक 86 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यादरम्यान हिटमॅनने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. शेवटी श्रेयस अय्यर 62 चेंडूत 53 धावा काढून नाबाद परतला. अय्यरने आपल्या अर्धशतकी खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्यासोबत केएल राहुल 19 धावांवर नाबाद राहिला.

याआधी फलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या.

Tags

follow us