Download App

IND vs PAK: भारत-पाकिस्तान 15 ऑक्टोबरला आमने -सामने, काय असू शकते वर्ल्ड कप 2023 चे पूर्ण वेळापत्रक पाहा…

  • Written By: Last Updated:

World Cup 2023 Schedule : वर्ल्ड कप 2023 ची तयारी सुरू झाली आहे. आयसीसी लवकरच त्याचे वेळापत्रक जाहीर करू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाक सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. नुकतीच दोन्ही देशांमधील सामन्याची तारीख समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाऊ शकतो. टीम इंडिया या स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळू शकते. (world-cup-2023-india-vs-pakistan-15-october-team-india-all-matches-schedule)

विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये आयोजित केला जाणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळू शकते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळवला जाऊ शकतो. यानंतर 11 ऑक्टोबरला भारताचा सामना अफगाणिस्तानशी होऊ शकतो. हा सामना दिल्लीत होणार आहे. भारताचा सामना 19 ऑक्टोबरला बांगलादेशशी होऊ शकतो. हा सामना पुण्यात होऊ शकतो.

WTC Final : विराट कोहलीचा हा फोटो पाहून तुम्हाला देखील दुःख होईल, पहा पराभवानंतरचे भावनिक फोटो

विशेष म्हणजे 2014 नंतर भारताला ICC विजेतेपदाच्या सामन्यात सतत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर वनडे वर्ल्ड कप 2015 च्या सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. T20 विश्वचषक 2016 च्या उपांत्य फेरीत पराभूत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम फेरीत आणि विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीत पराभव.

टीम इंडियाचे विश्वचषक 2023 चे वेळापत्रक:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध पात्रता संघ – 2 नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 5 नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध क्वालिफायर संघ – 11 नोव्हेंबर, बंगळुरू

 

Tags

follow us