Download App

भारताच्या वर्ल्डकप संघात दोन सर्वात मोठ्या कमजोरी, ‘या’ त्रुटींवर अनेकांनी बोट ठेवले

World Cup 2023: : विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेला गेलेल्या 17 खेळाडूंमधून या संघाची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि टिलक वर्मा वगळता सर्व खेळाडू आहेत. 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

आपल्या देशातील बहुतांश खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहेत, तरीही संघात एकही लेग-स्पिनर आणि ऑफ-स्पिनर नाही. 5 वेगवान गोलंदाजही संघात ठेवण्यात आले होते, परंतु त्यांच्यात एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नाही. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या त्रुटींवर अनेकांनी बोट ठेवले आहे.

ऑफ स्पिनर आणि लेग स्पिनरला संघात स्थान नाही
भारतातील 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत. जिथे फिरकीपटूंना सहसा उपयुक्त खेळपट्ट्या मिळतात. 17 सदस्यीय भारतीय संघात केवळ तीन फिरकीपटू आहेत. तिघेही डावखुरे गोलंदाज आहेत. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे डावखुरे स्लो ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहेत, तर कुलदीप यादव एक चायनामन म्हणजेच डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज आहे.

Team India For WC 2023 : प्रतीक्षा संपली! विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

याचा काय परिणाम होईल?
लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांना संघातून बाजूला करण्यात आले. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरच्या नावाचाही विचार करण्यात आला नाही, जो गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही चांगली करतो. ऑफस्पिनर्सविरुद्ध डावखुऱ्या फलंदाजांना त्रास होतो हे सर्वांनाच माहीत आहे. पाकिस्तानकडे डाव्या हाताचे फलंदाज भरपूर आहेत. श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही डाव्या हाताचे फलंदाज भरपूर आहेत. अशा परिस्थितीत हे खेळाडू जड्डू-अक्षर सहज खेळू शकतील.

पाच वेगवान गोलंदाजांमध्ये एकही डावखुरा गोलंदाज नाही
टीम इंडियामध्ये 3 पूर्णवेळ वेगवान गोलंदाजांसह 2 वेगवान अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील, तर शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्यासारखे अष्टपैलू संघाला मजबूत करतील. पण संघात एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नसणे चिंताजनक आहे.

800 Trailer: मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकचा टीझर झाला लॉन्च; ५ सप्टेंबरला सचिन करणार ट्रेलर प्रदर्शित

इतक्या वर्षांत संघ व्यवस्थापन एकही डावखुरा वेगवान गोलंदाज का तयार करू शकले नाही? अर्शदीप सिंगला टी-20 विश्वचषकात संधी देण्यात आली होती, मात्र त्याला वनडे फॉरमॅटपासून दूर ठेवण्यात आले होते. भारताकडे डावखुरे वेगवान गोलंदाज नाहीत असे नाही. खलील अहमद, टी नटराजन आणि चेतन साकारिया यांनी आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडली, पण त्यांना संधी दिली गेली नाही.

याचा काय परिणाम होईल?
डावखुरा वेगवान गोलंदाज कोणत्याही संघाच्या वरच्या फळीला उद्ध्वस्त करण्यास सक्षम असतात. भारताचेच उदाहरण घ्या. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शुबमन गिल, डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजासमोर सगळेच चाचपडत खेळतात. संघात डावखुरा वेगवान गोलंदाज नसेल तर भारतीय फलंदाज विशेष सराव करू शकणार नाहीत. पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान अडचणीत आणतील.

Tags

follow us