Team India For WC 2023 : प्रतीक्षा संपली! विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

  • Written By: Published:
Team India For WC 2023 : प्रतीक्षा संपली! विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

BCCI Announced India Team For WC 2023 : आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यात संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, टिळक वर्मा यांना जाहीर करण्यात आलेल्या वर्ल्डकप संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. या तीन खेळाडूंशिवाय युजवेंद्र चहललाही एकदिवसीय विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. भारत यजमान असणाऱ्या विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून,  19 नोव्हेंबररोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियासह अन्य प्रमुख संघांनी यापूर्वीच 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्वांच्या नजरा विश्वचषकाचे यजमानपद असणाऱ्या भारतीय संघाच्या निवडीकडे लागल्या होत्या. अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.  (Team India For World Cup 2023 )  

असा आहे विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

 

27 सप्टेंबरपर्यंत करता येणार बदल
दरम्यान, आगामी विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघामध्ये बदल करण्यासाठी प्रत्येक संघाला 27 सप्टेंबरपर्यंत बदल करता येणार आहे. त्यानंतर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांना जाहीर करण्यात आलेल्या संघामध्ये बदल करायचा असल्यास इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे.

800 Trailer: मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकचा टीझर झाला लॉन्च; ५ सप्टेंबरला सचिन करणार ट्रेलर प्रदर्शित

भारतीय संघाचे सामने कधी

एकदिवसीय विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून, भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. यानंतर टीम इंडिया 11 ऑक्टोबरला दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या मैदानावर भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार असून, पाकिस्तान संघाशी दोन हात केल्यानंतर भारताचा संघ 19 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी खेळणार आहे.

IND VS NEP : नेपाळचा ‘कबीर खान’ ज्याने बदलले क्रिकेट संघाचे नशीब

टीम इंडियाला 22 ऑक्टोबरला धर्मशाला येथे न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार असून, लखनौमध्ये २९ ऑक्टोबरला भारताचा इंग्लंडविरुद्ध सामना रंगणार आहे.  5 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर  भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार असून, 11 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये भारतीय संघाचा शेवटचा लीग सामना  होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube