Download App

World Cup 2023 : पुन्हा मोठा उलटफेर; ऑरेंज आर्मीकडून बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा !

  • Written By: Last Updated:

SA vs NED : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) पुन्हा एकदा एक मोठा उलटफेर झाला आहे. लिंबू-टिंबू संघात गणल्या जाणाऱ्या नेदरलँड्सच्या (Netherlands) ऑरेंज आर्मीने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) मोठा पराभव केला आहे. या वर्ल्डकपमध्ये पहिला उलटफेर अफगाणिस्तानने गतविजेता इंग्लंडला पराभूत करून केला होता. आता नेदरलँड्सने तो कित्ता गिरवत दुसरा मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या संघाने केलेल्या मोठ्या कामगिरीमुळे मोठ्या संघांचे गुणतालिकेतील गणित बिघडले आहे.

या बलाढ्या संघांच्या वर्ल्डकपमधील मोहिमेवरच आता शंका उपस्थित होऊ लागली आहे. नेदरलँड्सने दिलेल्या 246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ 42.5 षटकांत 207 धावांवर ऑलआऊट झाला. हा सामना नेटलँड्सने 38 धावांनी जिंकला आहे.

World Cup 2023 : वॉर्नर चिडला! अंपायवरच भडकला; त्यावेळी नेमकं काय घडलं ?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेदरलँड्स सामना हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आला. पंधरावा साखळी सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामन्याचे षटके कमी करून हा सामना 43 षटकांचा खेळविण्यात आला. त्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत 245 धावा उभारल्या. सुरुवातीला नेदरलँड्सची सुरुवात खराब झाली होती. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर नेदरलँड्सचे टॉप फलंदाजांचा निभाव लागला नाही. पाच फलंदाज 50 धावांत तंबूत परतले होते. तर 140 धावांवर सात फलंदाज बाद झाले होते.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया जिंकली अन् स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की टळली


कर्णधाराने इंगा दाखविला, गोलंदाजही मदतीला

नेदरलँडच्या कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने सातव्या क्रमांकाला फलंदाजीला येत आफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडून काढले. त्याने 78 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने दहा चौकार आणि एक षटकार मारले. त्याच्या जोरावर नेदरलँड्सने मोठी धावसंख्या उभारली होती. त्यानंतर गोलंदाजांनी आपली चोख कामगिरी करत बलाढ्य आफ्रिकेला धूळ चारली आहे.

परंतु तळाच्या फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत धावसंख्या आठ बाद 245 धावांवर नेली. ही धावसंख्या बलाढ्य व चोकर नाव पडलेल्या आफ्रिकेला गारद करण्यासाठी पुरेशी असल्याचे नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी सिध्द करून दाखविले आहे. प्रत्युत्तरात आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. डेव्हिड मिलर वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाही. डेव्हिड मिलर हा 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर ऑरेंज ऑर्मीच्या गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना सावरण्याची संधी मिळू दिली नाही. तळातील फलंदाज केशव महाराज याने 40 धावांची खेळी करत शेवटपर्यंत लढत देण्याचा प्रयत्न केला.

Tags

follow us