Download App

World Cup 2023 : पहिल्याच सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा न्यूझीलंडकडून धुव्वा !

  • Written By: Last Updated:

ENG vs NZ : विश्वचषकाच्या (World Cup 2023) पहिल्याच सामन्यात गजविजेत्या इंग्लंडला (Engaland) उपविजेत्या न्यूझीलंडने (New Zealand) नऊ विकेटने पराभूत केले आहे. डेवोन कॉन्वे (Devon Conway)(lhb)आणि रचिन रविंद्र (Rachin Ravindra) या दोघांच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने हा विजय मिळविला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ एक विकेटच्या बदल्यात 36. 2 षटकात पूर्ण केले आहे. त्यामुळे न्यूझीलंडची विश्वचषकाची सुरुवातच धमाकेदार झाली आहे.


भाजपने सत्ता कशी मिळवली? शरद पवारांनी सांगून टाकलं

न्यूझीलंडच्या कॉन्वे आणि रचिनने आपले शानदार शतके झळकविले. कॉन्वेने 121 चेंडूत 152 धावांची नाबाद खेळी केली. कॉन्वेने 19 चौकार आणि 3 षटकारांचा पाऊस पाडला. तर रचिनने 96 चेंडूत 123 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले. या दमदार कामिगरीमुळे रचिन हा सामनावीर ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विल यंग हा खाते न उघडताच तंबूत परतला. परंतु त्यानंतर विश्वचषकामध्ये पर्दापण करणाऱ्या कॉन्वे आणि रविंद्र यांनी इंग्लंडचा गोलंदाजांनी धुलाई केली. विश्वचषकात पहिल्यांचा पर्दापण करणाऱ्या एकाच संघातील दोन खेळाडूने शतके झळकविली आहे. रविंद्रचे हे पहिले शतक आहे. तर कॉन्वेने एकदिवसायी क्रिकेटमध्ये पाच शतके झळकविली आहेत.

World Cup 2023 : बीसीसीआयची मोठी घोषणा! वर्ल्डकप सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार ‘ही’ सुविधा

न्यूझीलंडची विश्वचषकात सर्वात मोठी भागीदारी
कॉन्वे, रविंद्रने विश्वचषकातील सर्व विक्रमही मोडले आहेत. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची भागीदारी केली आहे. विश्वचषकासाठी न्यूझीलंडकडून ही सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी रिकॉर्ड गेरमॉन आणि हॅरिस यांच्यात ऑस्ट्रेलियाविरोधात 1996 भागीदारी झाली होती.

इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई

कॉन्वे आणि रविंद्रने इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. मोइन अलीने 9.2 षटकांत 60 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळविता आली. तर मार्क वूडने 5 षटकांत सर्वाधिक 55 धावा दिल्या आहेत. सॅम करनला एक विकेट मिळाले. त्याने 6 षटकात 47 धावा दिल्या. इंग्लंडचे फलंदाजही अपयशी ठरले. जॉनी बेयरस्टो 33 धावांवर बाद झाला. इंग्लंडसाठी जो रुटने 77 धावांची खेळी केली. तर कर्णधार जोस बटलरने 43 धावांचे योगदान दिले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला आहे. मागील वेळी न्यूझीलंड उपविजेता ठरला होता. या संघाला इंग्लंडने पराभूत केले होते. त्याचा बदलाच न्यूझीलंडने एकप्रकारे घेत विश्वचषकाची शानदार सुरुवात केली आहे.

Tags

follow us