World Cup 2023 : पाकिस्तानी क्रिकेट संघाला बीफऐवजी काय दिलं जातंय? बीसीसीआयनं आहाराची केली ‘ही’ व्यवस्था

Pakistan Cricket Team : आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023)पाकिस्तानचा संघ भारतामध्ये पोहोचला आहे. यंदाच्या वर्ल्डकपचे यजमानपद भारताकडे आहे. हैदराबादमध्ये संघाचे जंगी स्वागतही करण्यात आले. हैदराबादमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी चिकन आणि मटन बिर्याणीवर ताव मारला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघाने (Pakistan Cricket Team)भारतीय पाहुणचार पाहून समाधान व्यक्त केलं. Panvel Mahanagarpalika मध्ये वैद्यकीय अधिकारी […]

Pakistan Cricket Team

Pakistan Cricket Team

Pakistan Cricket Team : आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023)पाकिस्तानचा संघ भारतामध्ये पोहोचला आहे. यंदाच्या वर्ल्डकपचे यजमानपद भारताकडे आहे. हैदराबादमध्ये संघाचे जंगी स्वागतही करण्यात आले. हैदराबादमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी चिकन आणि मटन बिर्याणीवर ताव मारला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघाने (Pakistan Cricket Team)भारतीय पाहुणचार पाहून समाधान व्यक्त केलं.

Panvel Mahanagarpalika मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांची भरती सुरू, महिन्याला ६० हजार पगार

पाकिस्तानी संघ भारतामध्ये तब्बल सात वर्षानंतर आला आहे. पाकिस्तानी संघाला भारतामध्ये गोमांस दिलं जात नाही. त्यासाठी आयसीसी वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी आलेल्या संघातील खेळाडूंच्या आहारासाठी बीसीसीआयने विशेष काळजी घेतली आहे. बीसीसीआयने वर्ल्डकपच्या मेनूमधून बीफ गायब केले आहे. याचा अर्थ खेळाडूंना वर्ल्डकपरम्यान कोणत्याही हॉटेलमध्ये बीफ मिळणार नाही. त्याऐवजी खेळाडूंसाठी चिकन आणि मासे आहारामध्ये मिळणार आहेत.


पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतामध्ये गोमांस खाता येणार नाही. त्याऐवजी खेळाडूंना प्रोटीन मिळवण्यासाठी चिकन आणि मासे आहारामध्ये ठेवण्यात आले आहेत. खेळाडूंच्या आहारामध्ये गिल्ड लॅंब चॉप्स, मटन करी, बटर चिकन आणि ग्रिल्ड फिशचा देखील समावेश असणार आहे.

Asian Games 2023 : भारताची सुवर्ण कामगिरी सुरूच; रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसलेला टेनिसमध्ये सुवर्णपदक

कार्बोहायड्रेटसाठी टीमने बॉइल्ड राइस, बोलोग्रीज सॉसमध्ये स्पेगेटी आणि शाकाहारी पुलाव देण्याचाही आग्रह केला आहे. पाकिस्तानी संघाला हैदराबादी बिर्याणी मात्र सर्वाधिक आवडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघ आता हैदराबादी बिर्याणीवर चांगलाच ताव मारणार आहेत.

वनडे वर्ल्ड कपच्या काळात पाकिस्तानी संघ हैदराबादमध्येच राहणार आहे. पाकिस्तानी संघ सुरुवातीचे पहिले दोन सामने हैदराबादमध्येच खेळणार आहे. वर्ल्ड कपच्या सामन्याला सुरुवात करण्याआधी पाकिस्तानी संघ दोन सराव सामने खेळणार आहे. त्यामधील पहिला सराव सामना 29 सप्टेंबरला न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करायचे आहेत. त्यानंतर पाकिस्तानी संघ 3 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध हैदराबादमध्येच सामना खेळणार आहे.

Exit mobile version