Asian Games 2023 : भारताची सुवर्ण कामगिरी सुरूच; रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसलेला टेनिसमध्ये सुवर्णपदक

Asian Games 2023 : भारताची सुवर्ण कामगिरी सुरूच; रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसलेला टेनिसमध्ये सुवर्णपदक

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे. यात आता महाराष्ट्राच्या रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्या टेनिसमधील सुवर्णपदकाने आणखी झळाली वाढली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील भारताचे हे 9 वे सुवर्णपदक आहे. तर टेनिसमधील पहिले सुवर्ण आहे. त्यामुळे रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एकत्रित प्रवास, शेजारी जागा, जाहीर कौतुक : अजितदादांचा मंत्री, शरद पवार-सुप्रिया सुळेंसोबत सावलीसारखा वावरला

रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसलेला टेनिसमध्ये सुवर्णपदक

ही कामगिरी करताना टेनिस मिक्स्ड डबल फायनलमध्ये रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी जोडीने तैपेईच्या जोडीचा 2-6, 6-3 आणि 10-4 असा सरल सेटमध्ये पराभव केला. अगोदर त्यांनी पहिला सेट गमावला होता. मात्र त्यानंतर त्यांनी दमदार कमबॅक केले. 6-2 च्या फरकाने त्यांना हा पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर त्यांना एन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या तैपेईच्या जोडीचा पराभव केला.

Ahmednagar Schools : शाळाबाह्य कामांमुळे शिक्षक वैतागले; तनपुरेंनी थेट शिक्षणमंत्र्यांना धारेवर धरलं

रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्या या कामगिरीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. यामध्ये फडणवीस म्हणाले की, तेजस्वी, महाराष्ट्र कन्या ऋतुजा भोसले आणि रोहन बोपन्ना यांचं आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस मिक्स्ड डबल फायनलमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल अभिनंदन. तिचं कुटुंब, कोच आणि महाराष्ट्राला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांचे प्रयत्न आणि श्रम यांचे हे फळ आहे. ऋतुजाचे वडील संपतराव भोसले हे डीवायएसपी आहेत. त्यांनी महाराष्ट्र गृहविभागासाठी 2 सुवर्णपदकं मिळवले आहेत.

Latur earthquake ला 30 वर्षे पूर्ण; 10 हजार लोकांचा मृत्यू, वाचा वेदनादायी कहाणी

भारताच्या पदकांची संख्या 35 वर…

आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे. त्यामध्ये आतापर्यंच भारताने 35 पदक मिळवली आहेत. त्यात 9 सुवर्ण, 13 रौप्य, 13 कांस्यपदकांचा समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube