World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) पाकिस्तान आणि न्यूझीलँड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठी महत्वाचाच आहे. त्यामुळे संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. तसेही काल अफगाणिस्तानने नेदरलँड्सला धक्का देत सेमी फायनलकडे वाटचाल सुरू केली आहे. पाकिस्तानही या शर्यतीत आहे. मात्र त्यांची वाट आता अधिक खडतर झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचे टेन्शन वाढले आहे. या दोन संघात सेमी फायनल फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.
अफगाणिस्तानने काल नेदरलँड्स संघावर दणदणीत विजय मिळवला. या विजयाने गुणतालिकेत मोठा बदल झाला. पाकिस्तान आणखी खाली ढकलला गेला. या विजयानंतर अफगाणिस्तानचे आठ गुण झाल्याने हा संघ पाचव्या क्रमांकावर आला आहे. तर पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आज पाकिस्तानची न्यूझीलँडशी सामना होणार आहे. जर या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही तर अफगाणिस्तानला मागे ढकलता येणार नाही. पाकिस्तान नुसता जिंकून चालणार नाही तर त्यांना मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे.
World Cup 2023 : अफगाणिस्तानने पाकला खाली खेचले ! न्यूझीलंडही धास्तीत, सेमीफायनलचे गणित बिघणार?
पाकिस्तानला मोठ्या विजयांची गरज
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळेही पाकिस्तानचे काम थोडे सोपे झाले आहे. पाकिस्तानला पुढील सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. फक्त विजय मिळवून चालणार नाही तर मोठ्या फरकाने हे सामने जिंकावे लागणार आहेत तरच संघाचे सेमी फायनलचे गणित जुळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड विरुद्धचा सामनाा तर सेमी फायनलसारखाच राहणार आहे. जर दोन्ही सामने पाकिस्तानने जिंकले तर त्यांचे 10 गुण होतील. त्यामुळे पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचेल. याशिवाय अफगाणिस्तानच्या पराभवासाठीही पाकिस्तानला प्रार्थना करावी लागेल. अफगाणिस्तानने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. पाकिस्तानलाही पराभवाचा धक्का दिला आहे.
पाकिस्तानची नजर भारतावरही असेल. भारताने श्रीलंकेचा पाडाव केला आहेच. त्यानंतर आता टीम इंडियाने नेदरलँड्सलाही पराभूत करावे असे पाकिस्तानला वाटत आहे. या सामन्यात जर नेदरलँड्स पराभूत झाला तर हा संघही स्पर्धेतून बाद होईल.