World Cup 2023 : अफगाणिस्तानने पाकला खाली खेचले ! न्यूझीलंडही धास्तीत, सेमीफायनलचे गणित बिघणार?

  • Written By: Published:
World Cup 2023 : अफगाणिस्तानने पाकला खाली खेचले ! न्यूझीलंडही धास्तीत, सेमीफायनलचे गणित बिघणार?

NED vs AFG: वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023World Cup 2023 : विजय टीम इंडियाचा पण, पाकिस्तान हॅपी; सेमी फायनलचं गणित जुळणार ?) अफगाणिस्तान संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. आज अफगाणिस्तानने (Afghanistan ) सात विकेट्सने नेदरलँड्सचा ( Netherlands) मोठा पराभव केला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या नेदरलँड्स संघ 179 धावांच करू शकला. नेदरलँडसने दिलेले 180 धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानने अवघ्या 32 व्या ओव्हरमध्ये तीन विकेटच्या बदल्यात गाठले. या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने तिसऱ्यांचा धावांचा पाठलाग केला आहे. या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने चार विजय मिळविले आहेत. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे. त्यामुळे आता चुरस निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानचे चांगले प्रदर्शनामुळे न्यूझीलंड, पाकिस्तान संघाला टेन्शन आले आहे

Maratha Reservation : ‘उद्धव ठाकरेंना बैठकीचं निमंत्रणच नव्हतं..,’; सुषमा अंधारेंनी राणेंना सुनावलं

पाकिस्तानला गुणतालिकेत अफगाण संघाने खाली खेचले आहे. पाकच्या पोटात गोळा आणण्याचे कामही अफगाणिस्तानने केले आहे. पाँइट टेबलमध्ये भारत सलग सात मॅच जिंकून 14 पाँईटने पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका सात पैकी सहा मॅच जिंकून बारा पाँइटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ सहा पैकी चार मॅच जिंकून आठ पाँइटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड संघ हा सात पैकी चार मॅच जिंकून आठ पाँइटसह चौथ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान आता सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सात पैकी तीन मॅच जिंकल्या असून, सहा गुण आहेत.

न्यूझीलंड, अफगाणिस्तानचे पाँइट सारखे आहेत. न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तानने या तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन मॅच राहिल्या आहेत. अफगाणिस्तानने उर्वरित मॅचमध्ये काही उलटफेर केल्यास न्यूझीलंड, पाकिस्तानसाठी धडकी भरविणारे असणार आहे.

कर्णधार शाहिदी आणि रहमतची जोरदार खेळी
180 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तानला पहिला झटका गुरबाजचा रुपात लागला. त्यानंतर इब्राहिमही जादरानही वीस धावांवर बाद झाला. त्यानंतर रहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागिदारी केली. रहमतने 52 आणि शाहिदीने 56 धावांची खेळी केली.

नबी आणि नूरसमोर नेदरलँड्स फसले

मोहम्मद नबी आणि नूर अहमदच्या फिरकीच्या जाळ्यात नेदरलँड्सचे फलंदाज फसले. एकवेळ नेदरलँड्स संघ दोन विकेट 92 धावांवर होते. तर त्यानंतर आठ विकेट अवघ्या 87 धावांवर पडल्या. चार फलंदाज रनआउट झाले.

आता अफगाणिस्तानसमोर मोठे चॅलेंज
अफगाणिस्तानच्या उर्वरित दोन मॅच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधात आहे. त्यातील एक मॅच जिंकली तरी अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत राहणार आहे. त्यावेळी रनरेटची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाकिस्तानच्या दोन लढती न्यूझीलंड आणि इंग्लंडबरोबर आहेत. या दोन्ही संघाला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचे दहा पाँइट होणार आहेत. त्यामुळे सेमीफायनलचे गणित हे रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube