World Cup 2023 : टीम इंडियाने काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (World Cup 2023) जबरदस्त खेळ करत श्रीलंकेचा दारुण पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव झाला. भारतीय गोलंदाजांच्या धारदार माऱ्यापुढे श्रीलंकेची (Sri Lanka) फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. या पराभवानंतर श्रीलंकेची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आता जवळपास संपुष्टात आली आहे. या विजयाने भारतीय चाहते तर खुश झाले आहेत शिवाय पाकिस्तानलाही (Pakistan) आनंद झाला असेल. याचे कारणही खास आहे.
या सामन्यातील पराभवामुळे श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे पाकिस्तानी संघाचा एक प्रतिस्पर्धी कमी झाला आहे. तरीही पाकिस्तानला पुढील सर्व सामने जिंकावेच लागणार आहे. एक पराभवही घरी जाण्याचे तिकीट नक्की करू शकतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि नेदरलँड्स या तीन संघाबरोबर पाकिस्तानची टक्कर होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड दोन्हीही बलाढ्य संघ आहेत. नेदरलँड्सनेही यंदाच्या स्पर्धेत दोन मोठे उलटफेर केले आहेत. या संघाने दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघाला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे या संघाला कमी लेखून चालणार नाही.
World Cup 2023 : शमी, सिराजचे मुंबईत तुफान, ‘लंकादहन’ करत भारताची सेमीफायनलमध्ये धडक !
पाकिस्तानला मोठ्या विजयांची गरज
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळेही पाकिस्तानचे काम थोडे सोपे झाले आहे. पाकिस्तानला पुढील सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. फक्त विजय मिळवून चालणार नाही तर मोठ्या फरकाने हे सामने जिंकावे लागणार आहेत तरच संघाचे सेमी फायनलचे गणित जुळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड विरुद्धचा सामनाा तर सेमी फायनलसारखाच राहणार आहे. जर दोन्ही सामने पाकिस्तानने जिंकले तर त्यांचे 10 गुण होतील.
त्यामुळे पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचेल. याशिवाय अफगाणिस्तानच्या पराभवासाठीही पाकिस्तानला प्रार्थना करावी लागेल. अफगाणिस्तानने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. पाकिस्तानलाही पराभवाचा धक्का दिला आहे. अफगाणिस्तानचे अजून तीन सामने बाकी आहेत. या तीन पैकी दोन सामन्यात अफगाणिस्तान पराभूत होणे गरजेचे आहे. तरच पाकिस्तानला फायदा होईल.
दिल्ली आणि मुंबईत वर्ल्डकप सामन्यांदरम्यान आतिशबाजी नाही, बीसीसीआयचा निर्णय
नेदरलँड्चा पराभवही गरजेचा
या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ही त्यांच्या सामन्यात पराभूत व्हावेत याचीही गरज राहणार आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय मिळवले आहेत. अफगाणिस्तानचे 6 गुण आहेत. जर अफगाणिस्तानने आणखी दोन सामने गमावले तर या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. याचबरोबर पाकिस्तानची नजर भारतावरही असेल. भारताने श्रीलंकेचा पाडाव केला आहेच. त्यानंतर आता टीम इंडियाने नेदरलँड्सलाही पराभूत करावे असे पाकिस्तानला वाटत आहे. या सामन्यात जर नेदरलँड्स पराभूत झाला तर हा संघही स्पर्धेतून बाद होईल.