World Cup 2023 : शमी, सिराजचे मुंबईत तुफान, ‘लंकादहन’ करत भारताची सेमीफायनलमध्ये धडक !

  • Written By: Published:
World Cup 2023 : शमी, सिराजचे मुंबईत तुफान, ‘लंकादहन’ करत भारताची सेमीफायनलमध्ये धडक !

IND vs SL : श्रीलंकेचा दारुण पराभव भारताने वर्ल्डकपच्या (World Cup 2023) सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह या घातक गोलंदाजांसमोर लंकेचा संघ अवघ्या 55 धावांत गारद झाला. त्यामुळे मुंबईतील सामना भारताने 302 धावांनी जिंकला आहे. भारताने लंकेसमोर 358 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) पाच, तर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) तीन बळी घेतले.

याचबरोबर या सामन्यात अनेक विक्रमही नोंदवले गेले आहेत. या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग सात सामने जिंकण्याचा विक्रमही केला आहे. तर लंकेचा संघ वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या कमी धावांवर गारद झाला आहे. याचबरोबर लंकेचे वर्ल्डकपमधील आव्हानही संपुष्टात आले आहे. मोहम्मद सिराजने सात षटकांत 16 धावा देत तीन, तर मोहम्मद शमीने 5 षटकांत 18 धावा देत पाच बळी घेतले आहेत. तर जसप्रीत बुमराहने पाच षटकांत आठ धावा देत एकही बळी घेतला.

World Cup 2023 : विराट, गिल, अय्यरची बॅट तळपली; भारताची 357 धावांवर मजल…

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लंकेला भारताने सुरुवातीपासूनच जोरदार धक्के दिले. बुमराहने पहिल्याच चेंडूवर सलीमावीर पाथूम निसांकाला तंबूत परतविले. डावाच्या दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने दोन जबरदस्त धक्के दिले. त्याने करुणारत्ने आणि सदीरा समरविक्रमाला बाद केले. त्यानंतर सिराजने आपल्या दुसऱ्या षटकात कर्णधार कुसल मेंडिसला बोल्ड केले. लंकेचे तीन धावांवर चार फलंदाज माघारी गेले. तेथे लंका पराभवाचा छायेत गेली.

India-Canada वादानंतर भारतीयांनी फिरवली पाठ; नमलेले टुड्रो देणार 5 लाख नागरिकांना प्रवेश

त्यानंतर डावाच्या दहा षटकांत मोहम्मद शमी गोलंदाजीला आला. त्याच्यासमोर लंकेचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. त्याने सलग दोन चेंडूवर चरिथ असलंका आणि दुशान हेमंथाला बाद केले. त्यानंतर दुश्मंथा चमीरा आणि अँजलो मॅथ्य्जूही बाद झाला. त्यानंतर नवव्या गड्यासाठी कसुन रजिथा आणि महीश तिक्षानाने वीस धावांची भागीदारी केली. शमीने रजिथाला बाद करत पाचवी विकेट घेतली. 20 षटकात रवींद्र जडेजाने मधुशंकाला बाद करत लंकेचा डाव 55 धावांवर संपुष्टात आणला.

गोलंदाजांच्या आधी श्रेयसचे तुफान, षटकारांचा पाऊस

भारताचा सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्माही दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली, शुभमन गिलेने जबरदस्त खेळी केली. गिलने 92 आणि कोहलीने 88 धावा करत दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरने 56 चेंडूत तब्बल सहा षटकार आणि तीन चौकार मारत 82 धावांची तुफानी खेळी केली. के. एल. राहुलने 21 धावा, सूर्यकुमार यादवने 12 धावा केल्या. रवींद्र जडेजानेही 35 धावांची खेळी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube