World Cup 2023 : विराट, गिल, अय्यरची बॅट तळपली; भारताची 357 धावांवर मजल…

World Cup 2023 : विराट, गिल, अय्यरची बॅट तळपली; भारताची 357 धावांवर मजल…

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये आजच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने 8 विकेटच्या बदल्यात 357 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाचे स्टार फलंदाज शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांचे थोडक्यात शतक हुकले. गिलने धुव्वाधार बॅटिंग करीत 92 धावांचा पल्ला गाठला तर विराट 88 आणि अय्यर 82 धावा काढल्या आहेत.

Ahmednagar News : नगरमधून मुलं-मुली बेपत्ता; संग्राम जगतापांचं पोलिस अधीक्षकांकडं साकडं

फलंदाजीला सुरुवात झाल्यानंतर सलामीचा फलंदाज रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिलाच धक्का बसला. त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिलने डाव सावरला होता. विराटने दमदार अर्धशतक ठोकलं तर कोहली आणि शुभम गिलने चांगलच मैदान गाजवल्याचं दिसून आलं आहे.

Mahesh Kale: ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

वानखेडेच्या मैदानावर विराट कोहलीने सचिनचा विक्रम मोडला आहे. वर्षभरात सर्वाधिक वेळा एक हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर आहे. शुभमन आणि विराटमध्ये 150 धावांची भागीदारी झाली आहे. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतकाकडे आगेकूच केली आहे.

Rahul Gandhi : ‘हॅकिंगला घाबरत नाही, अदानींनी माझा फोन न्यावा’; राहुल गांधींचं चॅलेंज!

लोकेश राहुलच्या रुपात भारताला चौथा धक्का बसला आहे. चमीराच्या भेदक गोलंदाजीपुढे लोकेशने गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं. लोकेश बाद झाला तेव्हा भारताची 39.2 षटकात 4 बाद 256 अशी अवस्था होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि राहुल यांना मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर फिनिशिंगची जबाबदारी असणारे हे दोन्ही फलंदाज लगेच तंबूत परतल्याचं दिसून आलं.

Maratha Reservation: आमदार कैलास पाटील यांना मुंबई पोलिसांकडून अटक

दरम्यान, पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या फलंदाजांनी धुव्वाधार बॅटिंग करीत श्रीलंकेसमोर 357 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये श्रीलंकेचे फलंदाज मैदानात कसं प्रदर्शन करणार? भारताने दिलेलं आव्हान पूर्ण करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube