Maratha Reservation: आमदार कैलास पाटील यांना मुंबई पोलिसांकडून अटक

Maratha Reservation: आमदार कैलास पाटील यांना मुंबई पोलिसांकडून अटक

Kailas Patil arrested: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन तसेच उपोषण सुरु आहे. अनेक जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाला टाळा ठोकल्यामुळे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) अटक करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी पुन्हा एकदा आमदार कैलास पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी मुंबईतील मंत्रालय परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सहकाऱ्यांसह लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केले आहे. (Maratha Reservation) मनोज जरांगे- पाटील यांनी आरक्षणासाठी लढा उभारला आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत जात आहे. तरी या सरकारला त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने समाज आक्रमक होत आहे.

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा’; आमदार गडाखांनी केली मागणी

समाजांच्या संयमाची अग्नीपरिक्षा सरकार घेत आहेत. त्यामुळे राज्यभर कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे. राज्यभर आंदोलन सुरू असतानाही जबाबदार असणारे हे सरकार इतकं स्वस्थ बसल्याने आता सामान्य जनतेत आमदार आणि लोकप्रतिनिधींविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरक्षण देण्याचा शब्द दिल्यानंतर देखील ४० दिवसानंतरही सरकार गंभीर नसल्याने हा आक्रोश निर्माण झाला आहे. आतातरी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजे, असे मत आमदार कैलास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्य उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव म्हणून ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube