Download App

World Cup 2023 : भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाची एन्ट्री पक्की; सेमीफायनलचा चौथा संघ कोणता?

World Cup 2023 : विश्वचषकात सध्या अनेक उलटफेर होताना दिसत (World Cup 2023) आहेत. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स सारख्या नवख्या संघांनी बलाढ्य संघांना घाम फोडला. तर इंग्लंडसारखा गतविजेता संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. सेमीफायनलच्या स्पर्धेत एन्ट्री मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असताना पाकिस्तानला (Pakistan) नशीबाने साथ दिली. पाऊस आला आणि 400 धावा करणारा न्यूझीलँड (New Zeland) पराभूत झाला. या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या शक्यता जिवंत राहिल्या आहेत. वर्ल्डकप लीग फेरीचा हा शेवटचा टप्पा असून प्रत्येक संघाचे एक किंवा दोनच सामने राहिले आहेत. त्यामुळे सेमी फायनलचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. मात्र खरी स्पर्धा चौथ्या क्रमांकासाठी आहे.

काल पाकिस्तान-न्यूझीलँड सामन्यात पाऊस झाला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडचा पाडाव केला. त्यामुळे इंग्लंडचे (England) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 10 गुण झाले. आता या संघाला बांग्लादेश (Bangladesh) आणि अफगाणिस्तान यांच्याबरोबर सामने खेळायचे आहेत. यातील एक जरी सामना जिंकला तरी ऑस्ट्रे्लियाचे सेमी फायनलचे तिकीट पक्के होणार आहे. भारत, दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यानंतर ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये एन्ट्री घेणारा तिसरा संघ ठरेल.

World Cup 2023 : इंग्लंडचा आणखी एक पराभव ! वर्ल्डकपबरोबर चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर

चौथ्या क्रमांकासाठी न्यूझीलँड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा एक सामना शिल्लक आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. तर अफगाणिस्तानचे दोन सामने शिल्लक आहेत. या संघाचेही 8 गुण आहेत. न्यूझीलंडचा पुढील सामना श्रीलंकेबरोबर आहे. हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न राहिल. दुसरीकडे पाकिस्तानचा सामना इंग्लंडबरोबर होणार आहे. या सामन्यात आता इंग्लंडला गमावण्यासारखं काहीच नाही. मात्र, पाकिस्तानसाठी हा सामनाही महत्वाचाच आहे. न्यूझीलंड पेक्षा चांगला रनरेट करायचा असेल तर पाकिस्तानला हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज राहणार आहे.

अफगाणिस्तान उलटफेर करणार का ?

श्रीलंकेने जर न्यूझीलंडचा पराभव केला तर पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या पराभवाकडे डोळे लावून बसावं लागेल. न्यूझीलंडचा रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. अफगाणिस्तानचे पुढील दोन सामने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांबरोबर होणार आहेत. दोन्ही सामन्यात अफगाणिस्तान जिंकेल याची शक्यता तशी कमीच आहे. पण जर दोन्ही सामने अफगाणिस्तानने जिंकले तर तो मोठा उलटफेर ठरेल.

World Cup 2023 : अफगाणिस्तानने पाकला खाली खेचले ! न्यूझीलंडही धास्तीत, सेमीफायनलचे गणित बिघणार?

Tags

follow us