Download App

World Cup 2023 : श्रीलंकेला धक्का! कर्णधारच वर्ल्डकपमधून बाहेर; कारणही आले समोर

World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून (World Cup 2023) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत श्रीलंकेची (Sri Lanka) कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. या स्पर्धेत श्रीलंकेला अजून एकही सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थितीत संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दुखापत श्रीलंकेसमोरील सर्वात मोठे आव्हान राहिले आहे. आता या दुखापतीनेच आणखी एका खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून कॅप्टन दासून शनाका (Dasun Shanaka) आहे. मांडीच्या दुखापतीमुळे शनाका स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी आता चमिका करुणारत्नेचा संघात समावेश करण्यात आला आहे.

World cup 2023 : 24 वर्षांनंतर भारत-पाक सामन्यात दुसऱ्यांदा गोलंदाज ठरला सामनावीर

दासून शनाका अचानक या स्पर्धेतून बाहेर पडल्याने श्रीलंका संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आधीच संघाची परिस्थिती चांगली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्या पराभव झाला आहे. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचे असेल तर पुढील सामने चांगला खेळ करून जिंकणे गरजेचे आहे. त्यात कर्णधार म्हणून शनाकाची कामगिरी चांगली राहिली आहे. तसेच तो संघाचा महत्वाचा खेळाडूही होता. मात्र, त्यालाही दुखापतीने घेरले. अशा परिस्थितीत संघाची बाजू कमकुवत झाली आहे.

आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत

या स्पर्धेत पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून श्रीलंका पराभूत झाला आहे. या दोन्ही सामन्यात रनरेटही फारसा चांगला नाही. त्यामुळे श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे. श्रीलंका अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहे. आता त्यांचा पुढील सामना 16 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकणे श्रीलंकेसाठी सोपे नाही.  कारण दोन्ही संघांनी अजून एकही विजय मिळवलेला नाही. त्यात ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेपेक्षा जास्त मजबूत दिसत आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

World Cup 2023 : पाकिस्तानचा दारुण पराभव, नरेंद्र मोदींनी केलं रोहित आर्मीचे अभिनंदन

पाकिस्तानचा दणदणीत पराभव

वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या लढतीत भारताने (India) पाकिस्तानवर (Pakistan) सात विकेट राखून दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयाबरोबर भारताने वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. या विजयासह गुणतालिकेतही (Point Table) भारताने मोठी झेप घेतली. गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आला आहे.

Tags

follow us