World Cup 2027: 2 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या महासंग्राम ! भारत-पाकिस्तान लढत कधी ?

World Cup 2027-या वर्ल्डकपमध्ये 14 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत 57 सामने खेळवले जाणार आहेत. सध्या 10 संघांनी विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.

Icc World Cup 2027

Icc World Cup 2027

World Cup 2027 Schedule : आयसीसीने (ICC) वनडे विश्वचषक 2027 (World Cup 2027 ) चे संपूर्ण वेळापत्रक गुरुवारी जाहीर केलंय. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये वर्ल्डकप खेळविला जाणार आहे. 2 ऑक्टोबर 2027 ते 21 नोव्हेंबर 2027 या कालावधीत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

या वर्ल्डकपमध्ये 14 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत 57 सामने खेळवले जाणार आहेत. सध्या 10 संघांनी विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. उर्वरित चार संघांची निवड 2027 मध्ये होणाऱ्या पात्रता फेरीतून होणार आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीला पात्रता फेरीतील तीन संघांमध्ये तीन सामने खेळवले जातील. या फेरीतील विजेता संघ मुख्य स्पर्धेतील 12 संघांच्या गटात प्रवेश करेल. यानंतर 12 संघांना दोन गटांत विभागले जाईल. प्रत्येक गटात सहा संघ असतील आणि प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध एक सामना खेळेल.

दोन्ही गटांतील अव्वल तीन संघ आणि दोन्ही गटांमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या संघांपैकी सर्वोत्तम संघ पुढील सुपर-7 फेरीसाठी पात्र ठरेल. सुपर-7 मध्ये सात संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतील. त्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीत पहिल्या क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी, तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी भिडेल. दोन्ही उपांत्य सामन्यांतील विजेत्यांमध्ये 21 नोव्हेंबर 2027 रोजी जोहान्सबर्ग येथे अंतिम सामना होईल.

भारताच्या सामन्यांकडे विशेष लक्ष
भारताचा पहिला सामना 7 ऑक्टोबर 2027 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केपटाऊनमध्ये होणार आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 10 नोव्हेंबर 2027 रोजी केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.

गट अ-भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, पात्रता फेरीतील संघ अ

बट ब-न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश, पात्रता फेरीतील संघ-ब


भारताचे साखळी फेरीतील प्रमुख सामने:

7 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया — केपटाऊन

10 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान — जोहान्सबर्ग

14 ऑक्टोबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान — त्श्वाने

17 ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालिफायर-A — ब्लोमफोंटेन

24 ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध भारत — व्हिक्टोरिया फॉल्स


ICC ने सुपर-7 फेरीसाठी सीडिंगही जाहीर केली आहे. त्यानुसार भारताला A1 स्थान देण्यात आले आहे.

A1 — भारत

A2 — ऑस्ट्रेलिया

A3 — पाकिस्तान

AB4 — इंग्लंड

B1 — न्यूझीलंड

B2 — दक्षिण आफ्रिका

B3 — श्रीलंका

Exit mobile version