World Cup Final : प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (World Cup Final) दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला तीन धक्के दिले. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट दुसऱ्या षटकात 16 धावांवर पडली. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला स्लिपमध्ये झेलबाद केले. वॉर्नरला तीन चेंडूत केवळ सात धावा करता आल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पाचव्या षटकात 41 धावांवर पडली. मार्शला जसप्रीत बुमराहने विकेटच्या मागे झेलबाद केले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने स्टीव्ह स्मिथला बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (IND vs AUS) 50 षटकांत 240 धावांवर केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. विराट कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रोलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान दिले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाज अचूक प्लान करून मैदानात उतरले होते. त्यांनी प्रत्येक फलंदाजासाठी वेगळे प्लान केला आला होता.
ऑस्ट्रोलियासमोर 241 धावांचे आव्हान; शमी, सिराज, बुमराहवर मदार
ऑस्ट्रेलियाची हळूहळू लक्ष्याकडे वाटचाल
तीन गडी बाद झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे फलंदाज संयमाने खेळत आहेत. मात्र, हळूहळू त्यांची वाटचाल ध्येयाकडे होत आहे. 15 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 78 धावा आहे. ट्रॅव्हिस हेड 27 तर मार्नस लॅबुशेन आठ धावांवर खेळत आहेत.