WC Qualifiers 2023: सध्या खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड कप क्वालिफायर मॅचमध्ये झिम्बाब्वेचा संघ चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. लीगमध्ये अमेरिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 408 धावांची ऐतिहासिक मजल मारली. संघाकडून कर्णधार शॉन विल्यम्सने 176 धावांची शानदार खेळी केली. (world-cup-qualifiers-2023-against-united-states-zimbabwe-scored-408-runs-his-highest-score-in-odi-captain-sean-williams-missed-double-hundred)
झिम्बाब्वेने वनडे इतिहासात प्रथमच 400 धावांचा टप्पा पार केला. कर्णधार शॉन विल्यम्सशिवाय जॉयलॉर्ड गुंबीने 103 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. तर सिकंदर रझाने 48 आणि रायन बर्लने 47 धावा केल्या. रझाच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता, तर रायन बर्लने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले.
कर्णधार शॉन विल्यम्सचे द्विशतक हुकले
या ऐतिहासिक धावसंख्येमध्ये कर्णधार शॉन विल्यम्सचे झिम्बाब्वेकडून द्विशतक हुकले. विल्यम्स त्याच्या द्विशतकापासून २६ धावा दूर राहिला. त्याने 101 चेंडूत 21 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 172.28 होता.
36 वर्षीय कर्णधार विल्यम्स आतापर्यंत क्वालिफायर सामन्यांमध्ये आपल्या संघासाठी उत्कृष्ट लयीत दिसला आहे. त्याने नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाबाद 102, नेदरलँडविरुद्ध 91 आणि आता अमेरिकेविरुद्ध 174 धावांची खेळी केली.
MS धोनीला कँडी क्रश खेळताना पाहिलं अन् तीन तासात 30 लाख चाहते तुटून पडले…
झिम्बाब्वेने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही
झिम्बाब्वेच्या संघाने आतापर्यंत विश्वचषक पात्रता फेरीत एकही सामना गमावलेला नाही. संघाने पहिला सामना नेपाळविरुद्ध 8 विकेटने, नेदरलँड्सविरुद्ध 6 गडी राखून आणि विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध 35 धावांनी विजय मिळवला, तर झिम्बाब्वे आपला चौथा सामना युनायटेड स्टेट्सविरुद्ध खेळत आहे. झिम्बाब्वेनेही आपल्या गटात अव्वल स्थान पटकावत सुपर-6 साठी पात्रता मिळवली आहे.