World Cup : बहुप्रतिक्षित क्रिकेटचा महासंग्राम उद्या (दि.5) सुरु होणार आहे. वर्ल्ड कपचा (ICC World Cup 2023) थरार सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा टीम इंडियाचा कर्णधार नसून चित्रपट दिग्दर्शक(Film director) असल्याचे भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin)म्हटले आहे. रविचंद्रन अश्विनने 2011 च्या विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा देताना कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle)यांच्या युट्यूब चॅनल कुट्टी स्टोरीज विथ ऍशमध्ये असं विधान केलं आहे. अश्विनच्या अशा वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीच्या 6 अन् भाजपच्या 5 आमदारांवर शिंदेंचा ‘वाघ’ भारी; भुजबळांना ‘वेट अॅन्ड वॉच’चा सल्ला
अश्विन म्हणाला की, धोनी हा एका चित्रपट दिग्दर्शकासारखा आहे, कारण दिग्दर्शक जसा त्याच्या पात्रानुसार कलाकारांची निवड करतो, तसाच महेंद्रसिंग धोनी सामन्यावेळी परिस्थिती पाहून आपल्या खेळाडूंचा वापर करत असायचा.
Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्ती ‘नंदिनी’ मध्ये दिसणार दमदार भूमिकेत
यावेळी महेंद्रसिंग धोनीबद्दल हर्षा भोगले म्हणाले की, तो पांढर्या चेंडूचा सर्वोत्तम कर्णधार होता. त्यानंतर तो लाल चेंडूचा कर्णधार झाला. त्याला आपल्या टीममध्ये असणाऱ्या खेळाडूंमध्येक सर्वोत्तम खेळी कशी करुन दाखवायची? तसेच धोनीला हे देखील माहिती होतं की आपण 10 विकेट गमावू शकत नाहीत तर ते सामना शेवटच्या शटकापर्यंत कसा नेता येईल.
अश्विनने यावेळी सांगितले की, मी नेहमी धोनीला विचारायचो की, माझी फलंदाजी कशी सुधारायची? कारण त्याच्यानंतर मी दुसरा माणूस होतो जो मैदानावर जायचा. तो नेहमी म्हणायचा की, माझ्या मनात असा विश्वास आहे की, मी कधीही कोणताही चेंडू मैदानाबाहेर काढू शकतो.
कुट्टी स्टोरीज विथ ऐशचा पाचवा एपिसोड आज रिलीज झाला. या एपिसोडमध्ये अश्विन आणि हर्षा भोगले यांनी 2011 च्या वर्ल्ड कपवर चर्चा केली. अश्विनचा हा शो सध्या चर्चेत आहे. त्यात वर्ल्ड कपबद्दलच्या अनेक किस्स्यांची चर्चा सुरु झाली आहे. कुट्टी स्टोरीजच्या पाचव्या भागामध्ये सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांच्याबद्दलही बरीच चर्चा झाली. या भागाला ‘द पिनॅकल’ म्हणजेच शिखर असं नाव देण्यात आलं.