राष्ट्रवादीच्या 6 अन् भाजपच्या 5 आमदारांवर शिंदेंचा ‘वाघ’ भारी; भुजबळांना ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चा सल्ला

राष्ट्रवादीच्या 6 अन् भाजपच्या 5 आमदारांवर शिंदेंचा ‘वाघ’ भारी; भुजबळांना ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चा सल्ला

नाशिक : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि आदिती तटकरे यांच्याकडे अद्याप कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. या दोघांनीही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चा सल्ला दिला आहे. (Nashik Guardian Minister dada bhuse vs ncp minister chhagan bhujbal)

नाशिकचा तिढा कायम :

नाशिकमध्ये सध्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे पालकमंत्री आहेत. मात्र संख्याबळाच्या बाबतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद दिसून येते. नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या 15 पैकी भाजपचे पाच आणि राष्ट्रवादीचे सहा पालकमंत्री आहेत. तर शिवसेनेचे दोन, काँग्रेसचा 1 आणि एमआयएमचा 1 आमदार आहे. विधानपरिषदेच्या बाबतीत शिवसेनेचे दोन आणि एक अपक्ष आमदार आहे. तर भाजपचे दोन खासदार आणि शिवसेनेचा एक खासदार आहे. मात्र त्यानंतरही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी शिवसेनेच्या दादा भुसे यांच्याकडे आहे.

चमत्कारच घडला! कामगाराचा खांद्यापासून वेगळा झालेला हात डॉक्टरांनी पुन्हा जोडला…

शिवाय छगन भुजबळ यांच्यासारखा ज्येष्ठ आणि अनुभवी नेताही मंत्रिमंडळात आहे. मात्र त्यानंतरही त्यांना सध्या पालकमंत्रीपदासाठी वेटिंगवरच ठेवण्यात आले आहे. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, नाशिकमध्ये आज राष्ट्रवादीचे पाच विधानसभा सदस्य आहेत. भुजबळांसारखे नेते राज्याच्या मंत्रिमंडलात 30 वर्षापासून काम करत आहेत. पण नाशिकचा विषय प्रलंबित आहे, त्याबाबत लवकरच निर्णय होईल, तिथं चर्चेनेच मार्ग निघेल, असं म्हणत तटकरे यांनी भुजबळ यांना ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चा सल्ला दिला आहे.

राज्यात तीन इंजिनचं नाही तर तिघडीचं सरकार; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सातारा आणि रायगडमधील त्रांगडंही कायम :

आज जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत यादीनंतर सातारा, रायगड या जिल्ह्यांच्याही पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. पुणे, सातारा आणि रायगड या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदांची मागणी अजितदादांच्या गटाकडून करण्यात आली होती. यातील पुण्याची मागणी पूर्ण झाली आहे. मात्र साताऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंत्री शंभुराज देसाई यांनी विरोध दर्शविला आहे. रायगडमध्येही शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास विरोध दर्शविली आहे. हा विरोध इतका तीव्र होता की 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी तटकरे यांना पालघरला पाठविण्यात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube