राज्यात तीन इंजिनचं नाही तर तिघडीचं सरकार; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

राज्यात तीन इंजिनचं नाही तर तिघडीचं सरकार; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Nana Patole On State Government : राज्य सरकारमध्ये सगळा बेबनाव चाललेला आहे. हे सरकार (State Government)नसून मलाईसाठी एकत्र आलेले सगळे लोकं आहेत. राज्यातील जनतेच्या कामाचा पैसा लुटणं हा एवढंच या लोकांचं काम आहे. आणि त्यासाठीच हे सरकार एकत्र आलेलं आहे. सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. राज्यात तीन इंजिनचं (Triple engine sarkar)नाही तर तिघडीचं सरकार असल्याची घणाघाती टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केली. मुंबईमध्ये (Mumbai)त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजितदादा कधीच नाराज नव्हते ते..,; नाराजीबद्दल बावनकुळेंनी थेट सांगून टाकलं

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्यामध्ये आत्ता भयावह परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)असेल किंवा नांदेडमध्ये (Nanded) जे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. त्याबद्दल सरकारचं गांभीर्य आपल्याला पाहायला मिळत नाही. सरकार त्याबद्दल कसं वागतंय? हे महाराष्ट्राचं एकप्रकारचं दुर्दैव आहे. हे खुनी सरकार आहे का? असा प्रश्न लोकांच्या मनात तयार झालेला आहे. हे निरपराध लोकांचा जीव घेणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे.

मोठी बातमी : महादेव ऑनलाइन लॉटरी प्रकरणी ईडीचे रणबीर कपूरला समन्स; 6 ऑक्टोबरला होणार चौकशी

राज्यात तीन इंजिनचं नाही तर तिघडीचं सरकार आहे. एक एकाला ओढतो. दुसरा तिसऱ्याला ओढतो आणि महाराष्ट्रामधील जनता वाऱ्यावर आहे, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. कधीनव्हे ती परिस्थिती आज महाराष्ट्रावर ओढवलेली आहे. या सरकारचा सर्वत्र धिक्कार होताना दिसत आहे.

महाराष्ट्रामधील सरकारची अस्थिरता पाहता आणि राज्यातील आरोग्य सेवा असेल शैक्षणिक व्यवस्था असेल. राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती जी आहे, कुठे ओला दुष्काळ कुठे कोरडा दुष्काळ आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जे काही चित्र आपण पाहिलं.

सरकार दिल्लीमध्ये आणि काही शिवनेरीमध्ये अशी जी परिस्थिती आहे, अशा गंभीर प्रश्नाबद्दलची चर्चा आमची झाली असल्याचे यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube