अजितदादा कधीच नाराज नव्हते ते..,; नाराजीबद्दल बावनकुळेंनी थेट सांगून टाकलं

अजितदादा कधीच नाराज नव्हते ते..,; नाराजीबद्दल बावनकुळेंनी थेट सांगून टाकलं

Chandrashekhar Bawankule : अजितदादा कधीच नाराज नव्हते ते तर स्पष्ट वक्ते आहेत, असं थेट भाष्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवार यांच्या नाराजीवर केलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी सातारा लोकसभेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बावनकुळे दादांच्या नाराजीवर स्पष्ट बोलले आहेत.

Maharashtra : मलिन होणारी प्रतिमा सुधारा; दिल्ली दौऱ्यात शाहांनी शिंदे-फडणवीसांना झापलं

अजित पवार यांच्या नाराजीवर बोलताना बावनकुळेंनी सांगितलं की, राज्यात सध्या तीन पक्षाचं सरकार आहे, सरकारच्या तीनही पक्षातील लोकांना सर्वच गोष्टी जुळवून घ्यावा लागतात, आता अजित पवार पालकमंत्री झाले आहेत, त्यांच्यासोबत इतरही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली आहे, आणखीन 9 पालकमंत्र्यांची भर पडल्याने राज्याचा विकास जलद गतीने होणार असल्याचं ठामपणे बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

नांदेडमध्ये औषधांचा तुटवडा नव्हता, चौकशी करून कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट घेऊन अजित पवारांनी राज्य सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्यासह आमदारांना वजनदार खाती मिळाली. तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजित पवार गट आणि भाजपात धुसफूस सुरू होतीच. अखेर या वादावरही समाधानकारक तोडगा काढला असून अजित पवारांच्या गटाला गुडन्यूज मिळाली आहे.

Fighter: हृतिक अन् सिद्धार्थचा ‘फायटर’ ची एक खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला

ज्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात धुसफूस सुरू होती त्या पदाची माळ अजित पवार यांच्या गळ्यात पडली आहे. राज्य सरकारने आज राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर पुणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलीयं.

‘एकाच दिवसांत एवढे मृत्यू..,’; नांदेड घटनेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, काँग्रेसला ब्लड कॅन्सर, काँग्रेसच्या रक्तात संभ्रम निर्माण करण्याचं राजकारण असून 65 वर्षे सरकार चालवलं काँग्रेसने लोकांना संभ्रमातच ठेवलं आहे. ज्या लोकांना काँग्रेसने संभ्रमात ठेवलं त्या लोकांचं मनपरिवर्तन आम्ही करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

जातिनिहाय जनगणनेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. केंद्र सरकार फक्त जनगणना करतं, पण जातिनिहाय जनगणना करण्याचा अधिकार राज्याला असून घटनेप्रमाणे एसएसी एसटी आणि इतर अशा जनगणना झाल्या असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube