‘एकाच दिवसांत एवढे मृत्यू..,’; नांदेड घटनेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

‘एकाच दिवसांत एवढे मृत्यू..,’; नांदेड घटनेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Supriya Sule : एकाचं दिवसांत एवढे मृत्यू होत असतील तर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. या दुर्घटनेत 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. सुप्रिया सुळेंनीही या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

‘आम्हाला डिवचल्यास गप्प बसणार नाही’; जरांगेंचा भुजबळांना कडक इशारा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, नांदेडमधील झालेले मृत्यू अपघात नाही. या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. एका दिवसात एवढे मृत्यू होत असतील तर त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश देणे अपेक्षित असल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं आहे. या घटनेप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तत्काळा रुग्णालयाला भेट दिली आहे.

दोन नेत्यांच्या सांगण्यावरून नोटीस; रोहित पवारांच्या आरोपावर अजितदादा म्हणाले, ‘अकारण नोटीस…’

यावेळी ते म्हणाले, रुग्णालयात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 8 बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. काही प्रसूती झालेल्या महिलांचाही समावेश आहे. काही रुग्णांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे. रुग्णालयाची परिस्थिती चिंताजनक असून अनेक नर्सेसच्या बदल्या झाल्या आहेत, डॉक्टरांची कमतरता असल्याने शासनाने इथल्या आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

नांदेडमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांकडून त्यांची समिती मंगळवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही नागरिकांमधून करण्यात येत आहे.

गाडीत बसवलं, घरी नेलं, जुन्या शिलेदाराची भेटही घडवली : अजितदादांच्या आमदाराकडून पवारांचा पाहुणचार

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करा ;
राज्य सरकारने काढलेल्या कंत्राटी भरतीचा जीआर तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी ठाम भूमिका सुप्रिया सुळे यांनी यावेळी माडंली असून राज्य सरकारच्या धोरणामुळे राज्यात बेरोजगारी वाढली असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

“बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने…” : ठाकरेंच्या टीकेवर शेलारांचा पलटवार

शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या संकटांना समोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी आहे. तर कापूस आणि सोयाबीन पिकांवर आलेल्या रोगांमुळे शेतकरी पूर्णतः खचून गेलेला आहे. या तिघाडी सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, ही दुर्देवी घटना असून उद्या नांदेडमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांकडून त्यांची समिती मंगळवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube