Download App

WTC न्युझीलंडवर ऑस्टेलियाचा विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये फेरबदल; भारत अव्वल स्थानी कायम

WTC : ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये ( WTC ) न्युझीलँडचा सुपडा साफ केला. क्राईस्टचर्च या ठिकाणी खेळण्यात आलेल्या या दुसऱ्या सामन्यामध्ये कांगारूंनी तीन विकेटने विजय मिळवला. न्यूझीलंडकडून ठेवण्यात आलेल्या 219 धावांचं लक्षवेध ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावत हा विजय मिळवला.

आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

ऑस्ट्रेलियाचा हा विजय आणि न्यूझीलंडचा पराभव यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंड टीम आता तिसऱ्या स्थानावर आली आहे. या अगोदर भारताने इंग्लंडवर विजय मिळवत न्यूझीलंडला दुसऱ्यास्थानावर ढकलले होते. तर आता ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये न्युझीलँडचा पराभव केल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये न्युझीलँड तिसऱ्या स्थानावर गेले आहे.

विजयबापू शिवतारेंना सतत दमात घेणारे ‘अजितदादा’ आता शांत का?

तर या विजयानंतर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने न्युझीलँडचा पराभव केल्याने पॉईंट टेबलमधील भारताच्या स्थानावर कोणताही परिणाम झालेला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 बद्दल सांगायचे झाले. तर पॉईंट टेबलमध्ये भारताच्या पॉईंट्सची टक्केवारी 68.51 असून तो पहिल्या स्थानावर आहे.

Electoral Bonds : खटले जिंकून देणाऱ्या साळवेंचा युक्तिवाद कुचकामी; सुप्रीम कोर्टाने उडवल्या चिंधड्या

नऊपैकी सहा सामने जिंकले आहेत. दोन सामन्यांमध्ये पराभव तर एक सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे भारताचे 74 पॉईंट्स आहेत. न्युझीलँडवर दुसऱ्या टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पॉईंट्सची टक्केवारी 62.50 आहे. त्यांनी 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. 3 सामन्यांमध्ये पराभव तर एक सामना ड्रॉ झाला आहे.

follow us