Download App

शुभमन गिल गुजरात टायटन्सचा नवा ‘सेनापती’ : हार्दिक पांड्यानंतर मिळाली मोठी जबाबदारी

मुंबई : ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबईच्या ताफ्यात गेल्यानंतर युवा शुभमन गिल (Shubman Gill) गुजरात टाटयटन्स चा नवा कॅप्टन असणार आहे. याबाबत गुजरात टायटन्सने ‘एक्स’वरुन अधिकृत घोषणा केली. कॅप्टन शुभमन गिल उत्साहाने आणि हिंमतीने टायटन्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. त्याल त्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा, असा संदेश लिहित गुजरात टायटन्सने नव्या कॅप्टनची घोषणा केली. (After all-rounder Hardik Pandya joins the Mumbai squad, young Shubman Gill is the new captain of Gujarat titans)

हार्दिक मुंबईच्या ताफ्यात :

तब्बल दोन तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर IPL 2024 साठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात परतला आहे. यामुळे आता दोन वर्षे गुजरात टायटन्सचे (Gujrat Titans) कर्णधारपद भुषविल्यानंतर हार्दिक पुन्हा एकदा पाचवेळच्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. रविवारी रिटेन्शन डे च्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर अखेरच्या दोन तासांमध्ये हार्दिक मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. आयपीएल इतिहासात आजपर्यंतचा हा सर्वात महागडा ट्रेड मानला जात आहे.

दोन तासांमध्ये घडामोडी कशा घडल्या?

स्टार स्पोर्ट्समधील रिटेनशन शो दरम्यान, गुजरातने हार्दिकला रिटेन केल्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतरही हार्दिकच्या मुंबईत पतरण्याच्या आशा जिवंत होत्या. कारण औपचारिक कागदपत्रे तयार झाली नव्हती आणि रिटेन ठेवण्याची मुदत संपल्यानंतरही ट्रेडिंग विंडो ओपन राहणार होती. संध्याकाळी 5.25 च्या सुमारास, हार्दिकला रिटेन कायम ठेवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर 7.25 च्या सुमारास क्रिकेट वेबसाइट क्रिकबझने हार्दिक मुंबईत परतला असल्याचे वृत्त दिले.

IPL 2024 : मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत! अखरेच्या दोन तासांत गुजरातने ‘सेनापती’ सोडला

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूर्णपणे रोख करार आहे. मुंबई इंडियन्सने आधी 17.5 कोटी रुपये दिलेल्या कॅमेरॉन ग्रीनला आरसीबीसोबत ट्रेड केले. त्यानंतर त्याच पैशांच्या बदल्यात हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजले. याशिवाय वेगळ्या ट्रान्सफर फीवरही सहमती झाली असून त्यातील 50 टक्के रक्कम हार्दिकला दिली जाणार आहे आणि उर्वरित 50 टक्के रक्कम गुजरात टायटन्सला दिली जाणार आहे. मात्र, या रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.

Tags

follow us