Zim vs Pak ODI : पाकिस्तान क्रिकेट संघाला पुन्हा एकदा लाजिरवाण्या पराभवाला (Zim vs Pak ODI) सामोरे जावे लागले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेकडून 80 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने (Zimbabwe) पाकिस्तान (Pakistan) समोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली आणि फक्त 50 धावांत पाकिस्तानने पाच विकेट गमावल्या. जेव्हा या सामन्यात पावसाने हजेरी लावली तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या सहा गडी गमावून 60 धावा होती. मात्र पावसामुळे सामना पुढे खेळता आला नाही. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 80 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या विजयानंतर झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नगारावाने 48 धावांची खेळी केली तर सिकंदर रझाला अष्टपैलू कामगिरी केल्याने सिकंदर रझाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकात अब्दुल्ला शफीक आणि त्यानंतर सैम अयुब पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शॉन विल्यम्सने कामरान गुलाम आणि इरफान खानला आपला बळी बनवले. तर आगा सलमान आणि हसीबुल्ला खानला सिकंदर रझाने (Sikandar Raza) बाद केले. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा पाकिस्तानने 21 षटकांत 6 गडी गमावून 60 धावा केल्या होत्या आणि मोहम्मद रिझवान (नाबाद 19) आणि आमेर जमाल (नाबाद 0) क्रीजवर होते. सततच्या पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला.
Gautam Adani Group: गौतम अदानी पुन्हा अडचणीत, बांगलादेशात ‘या’ डीलची होणार चौकशी
झिम्बाब्वेसाठी सिकंदर रझाने तीन षटकांत सात धावा देत दोन बळी घेतले. शॉन विल्यम्सने सहा षटकांत 12 धावांत दोन फलंदाज बाद केले. ब्लेसिंग मुझाराबानीने पाच षटकांत नऊ धावा देत दोन गडी बाद केले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून आगा सलमान आणि फैसल अक्रमने तीन – तीन विकेट घेतले तर आमेर जमाल, मोहम्मद हसनैन आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी एक – एक विकेट घेतले.