Video : मोठी बातमी! पाकिस्तानात पुन्हा दहशतवादी हल्ला, 38 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Terrorist Attack In Pakistan : पाकिस्तानमध्ये (Pakistan) पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, या हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खैबर पख्तूनख्वाच्या (Khyber Pakhtunkhwa) कुर्रम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या 3 वाहनांवर गोळीबार केली. यात 38 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना लोअर कुर्रममध्ये घडली असून ज्या वाहनांना टार्गेट करण्यात आले. ही वाहने पाराचिनारहून पेशावरकडे जात होती. गोळीबारानंतर वाहनांना आग लागली आणि 38 जणांचा जागीच मृत्यू झाला.
नाना म्हणतात मी मुख्यमंत्री होणार, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मविआ’ चा ताबा शरद पवारांकडे
#Alert
Unknown militants attacked the vehceil convoy of Shiites in the Kurm region of Khyber Pakhtunkhwa; 17 people were killed and 32 others were injured.#Kuram pic.twitter.com/x6tOPgDGIK— نقطةNUQTA (@NUQTA31) November 21, 2024
याबाबत माहिती देत जिल्हा पोलिस कार्यालय (डीपीओ) कुर्रमच्या प्रवक्त्याने सांगितले की उपायुक्त आणि डीपीओ यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. दोन जमातींमधील संघर्षांमुळे हल्ला झाला असावा असा अंदाज डीपीओकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या महिन्यातही खैबर पख्तूनख्वामधील अप्पर कुर्रम जिल्ह्यात दोन जमातींमधील संघर्षात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
राहुल गांधींची मागणी योग्यच, अदानींना अटक करा, नरेंद्र मोदींवर नाना पटोलेंचा हल्लाबोल