Download App

पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युतीवर मुंबईत घोषणा झाली

  • Written By: Last Updated:

पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युतीवर मुंबईत घोषणा झाली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत घेत घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरु आहे. त्यापूर्वीच ह्या दोन्ही गटाची युती झाली आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी ही युती काम करेल,” असं प्रा. जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले.

यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून या युतीची बोलणी सुरु होती. महाराष्ट्राला आज एक धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे. हे सर्व सामान्य जनतेचं सरकार आहे. ही पावती सर्वसामान्य जनतेने दिली आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही या युतीचा निर्णय घेतला आहे.

शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची ही युती आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी ही युती काम करेल. ही युती महाराष्ट्रात पाच जाहीर सभा घेणार आहेत. तिथे हजारोंच्या संख्येत लोक येतील, असे प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांचं युतीत स्वागत केलं. “पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आमचा संघर्ष साधा सोप्पा नव्हता, तुम्हा सर्वांना इतिहास माहित आहे. कवाडे यांनीही फार मोठा संघर्ष केला आहे.

इथे कोणी देण्याघेण्याासाठी आलेले नाहीत. तुम्ही असा अर्थ जोडू नका. ज्यांना आमच्या पक्षाचे विचार पटतील त्यांचं स्वागत आहे. लोकसभेत शिवसेना आणि भाजप युती क्लीन स्विप करेल,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

No liveblog updates yet.

LIVE NEWS & UPDATES

Tags

follow us