Download App

पुण्यात ATS आणि पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना घेतले ताब्यात

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यात दहशतवादविरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने (ATS)  मोठी कारवाई केली आहे. एटीएसने देशविरोधी कारवायांच्या संशयावरून पुण्यातून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलीस (Pune Police) आणि एटीएसने ही संयुक्त कारवाई  केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर आणखी एक आरोपी फरार असल्याचेही वृत्त आहे. (Anti terrorist squads big operation in Pune two youth arrested)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री एटीएसने ही कारवाई करत या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. तर या दोघांचा तिसरा साथीदाराने पळ काढला आहे. दरम्यान, या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, या दोन तरुणांच्या लॅपटॉपमध्ये एटीएसला संशयास्पद माहिती मिळाली आहे. त्यामुळेच देशविरोधी कारवाया केल्याच्या संशयावरून त्यांना तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, पुणे पोलिस आणि एटीएस या दोन्ही तरूणांची कसून चौकशी करत आहे.

Eknath Shinde : बैठक NDA ची पण चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेची… 

यापूर्वीही पुण्यात एटीएसने अशीच कारवाई केली होती. एटीएसने गेल्या वर्षी मे महिन्यात पुण्यातून एका तरुणाला अटक केली होती. आरोपी हा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याला पुण्यातील दापोडी येथून अटक करण्यात आली. संबंधित तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आला. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती.

 

Tags

follow us