Bageshwar Baba : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराजांनी(Bageshwar Baba) संत तुकोबारायांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर आज पुण्यात तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. बागेश्वर बाबांचा पुण्यात तीन दिवसीय कार्यक्रम पार पडत आहे. बागेश्वर बाबांनी तुकोबारांयांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर चूक लक्षात आली का? असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. या प्रश्नावर बागेश्वर बाबांनी(Bageshwar Baba) संत तुकाराम महाराजांबद्दल भाष्य करुन चुकीत सुधारणा केली असल्याचं मोठं विधान केलं आहे.
नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे दाऊद कनेक्शन?
बागेश्वर बाबा म्हणाले, मी तेव्हा एक लेख वाचला होता. त्या लेखाच्या आधारे मी त्या भाषेत बोललो होतो. त्याआधीही मी महाराष्ट्रात आलो होतो. त्यामुळे मला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती आहे. मी त्यांच्याविषयी जेवढं शक्य होतं तेवढं वाचलं आहे. मी असं कधीही कोणत्याही संताविषयी म्हटलेलं नसल्याचं बागेश्वर बाबांनी स्पष्ट केलं.
Eknath Khadse : ‘मराठा समाजाला दिलेला शब्द पाळा’; खडसेंनी फडणवीसांना घेरलं
तसेच तेव्हा बोलताना माझ्यावर स्थानिक भाषेचा प्रभाव होता. कुणी साखर म्हणतं, तर कुणी शुगर म्हणतं. त्यामुळे मी निश्चितपणे स्वीकारलं की, माझ्या बोलण्यामुळे वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांना मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या. माझ्या बोलण्यात काही दोष असेल तर, तो मी स्वीकारला आणि सुधारणा केली असल्याचंही ते म्हणाले आहेत.
कृषीमंत्री Dhananjay Munde यांच्या ‘त्या’ कामाची केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार
मी आचार्य परंपरेचा साधक आहे. असा व्यक्ती कोणत्याही संताचा विरोध करेल असं होणार नाही. तसेच असा विरोध करणारा संतांचा अनुयायी होऊच शकत नाही. मी भारत हिंदूराष्ट्र व्हावं हा संकल्प घेऊन निघालो आहे. त्यामुळे मी संत महात्म्यांची प्रशंसा करण्याऐवजी विरोध करत असेल, तर पाश्चिमात्य संस्कृतीचे संस्कार आमचा हा प्लॅनच गिळून टाकतील. म्हणूनच मी हात जोडून संपूर्ण वारकरी संप्रदायासमोर खेद व्यक्त केला होता, असंही ते म्हणाले आहेत.
‘राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट..,’; बावनकुळेंच्या कथित व्हायरल फोटोवर फडणवीस बोलले
मी संत तुकाराम महाराजांच्या शीलेचं दर्शन घेतलं. त्यांनी आपले अभंग इंद्रायणी नदीत सोडून दिले होते. मात्र, संत तुकारामांच्या तपस्येमुळे ते अभंग नदीत बुडाले नाहीत. त्यांना पाण्याचा स्पर्शही झाला नाही आणि ते पाण्यावर तरंगले. ही संतांची परंपरा असल्याचं बागेश्वर बाबांनी स्पष्ट केलं आहे.