Download App

बृहन्मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर

मुंबई : देशातली सर्वात मोठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या 4 फेब्रुवारी रोजी सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिलीय. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त चहल सादर करणार आहेत.

महानगरपालिकेच्य सदस्यांची मुदत संपल्याने महापालिकेचा सर्व कारभार आयुक्तांच्या हाती आला आहे. त्यामुळे आता आयुक्तांवर अर्थंसंकल्प सादर करण्याची जबाबदारी आयुक्तांवर आलीय. पालिकेवर मागील 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती.

तर महाविकास आघाडीच्या काळात महापालिकेच्या वार्डांची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला होता. 227 ऐवजी 237 वार्ड निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर आक्षेप घेण्यात आला होता. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायायलात प्रलंबित आहे.

त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळेच महानगरपालिकेचा सर्व कारभार आयुक्तांकडे आला आहे. राज्यात आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस यांची छाप असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची पत्रकार परिषद होणार आहे.

Tags

follow us