मुंबई : ‘मला एसीबीची नोटीस आली हे आपेक्षितच आहे. तशी मानसिकता सुद्धा आम्ही केली आहे. पण जो तक्रारदार आहे तो अकोल्यातला एक गुन्हेगार आहे. त्या व्यक्तीचं आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संभाषणाची क्लिप त्या दिवशी मी व्हायरल करेल. असा इशारा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. भाजपवर टीकाही केली आहे.
‘मला एसीबीची नोटीस आली हे आपेक्षितच आहे. तशी मानसिकता सुद्धा आम्ही केली आहे. पण या नोटीसवर तक्रारदाराचे नाव नाही. तसेच या नोटीसमध्ये माझी कोणती प्रॉपर्टी अवैध आहे किंवा गैरमार्गाने कमावली आहे.
याचा देखील उल्लेख नाही. मी निवडणुकीचा फॉर्म भरला त्यावेळीच माझ्या पूर्ण संपत्तीचं विवरण निवडणूक आयोगाला सादर केलं आहे. तर आमदार झाल्यानंतर झालेले खरेदी-विक्रीचे जे काही व्यवहार झाले ते निबंधक कार्यालायातच झाले आहेत.’
‘त्यामुळे माझी प्रॉपर्टी अवैध आहे हा एसीबीचा प्रश्नच चुकीचा आहे. मला एसीबीने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पैसा कोठुन आणला असा प्रश्न विचारायला हवा होता. म्हणजे मला त्यांच्याकडे येऊनच सादर करता येईल. पण मला एसीबीच्या काही अधिकाऱ्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रारदाराचे नाव सांगण्यात आले आहे.’
‘जो तक्रारदार आहे तो अकोल्यातला एक गुन्हेगार आहे. त्यामुळे असा व्यक्ती तक्रार करतो आणि एसीबी त्याची दखल घेते हा चिंतेचा विषय आहे. तर त्या व्यक्तीचं आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे संभाषण झालं. ते संभाषण काय झालं ? कशासाठी झालं.
ते नितीन देशमुखांना शिंदे गटात आणण्यासाठी होतं. त्या संभाषणाची क्लिप त्या दिवशी मी व्हायरल करेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा गुन्हेगार सोबत कसे संबंध ठेवतात ? हा मुळात प्रश्न आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना हा भाजपने रचलेला डाव आहे. हा डाव महाराष्ट्रातील जनता हाणून पाडणार आहे.’
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस जारी केली आहे. तर येत्या 17 तारखेला त्यांना एसीबीने हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर त्यांनी ‘जो तक्रारदार आहे तो अकोल्यातला एक गुन्हेगार आहे.
त्यामुळे असा व्यक्ती तक्रार करतो आणि एसीबी त्याची दखल घेते हा चिंतेचा विषय आहे. तर त्या व्यक्तिचं आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे संभाषण झालं. ते संभाषण काय झालं ? कशासाठी झालं. ते नितीन देशमुखांना शिंदे गटात आणण्यासाठी होतं. त्या संभाषणाची क्लिप त्या दिवशी मी व्हायरल करेल. असा इशारा दिला आहे.