बीड : बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद चिन्हांवरून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांना इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर या असे खुले आव्हान दिले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागरने त्यांचा पराभव केला. पुढे जयदत्त क्षीरसागर महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेने पासून लांब जात भाजपच्या जवळ गेले त्यामुळे त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले.
पत्रकारांशी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भाजप आणि भाजपमधील नेत्यांचा वापर केला जातोय. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांनी आता इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर यावं असे आव्हान आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना दिले.
कुठे आहेत? त्यांची भूमिका काय, या प्रश्नांची उत्तर देताना संदीप क्षीरसागर म्हंटले, राजकारणामध्ये भूमिका स्पष्ट असावी लागते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलं आहे हा त्यांचा इतिहास आहे. ते कुठे आहेत हे त्यांनाच माहिती ते मी नाही सांगू शकत