Download App

रवींद्र धंगेकर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार? पटोले म्हणाले, ‘काही लोक जिकडे सत्ता तिकडे…’

राजकारणात काही लोक व्यावसायिक असतात. सत्ता जिथे असेल त्याबाजूने वागणारे काही लोक असतात. त्यामुळं यावर आज कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही.

  • Written By: Last Updated:

Nana Patole : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची काँग्रेस नेते-माजी आमदार वींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी काल भेट घेतली. त्यामुळं ते काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देणार आणि धनुष्यबाण हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधान आलं. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य केलं.

अंकुश चौधरीकडून चाहत्यांना रिटर्न गिफ्ट, ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ ची घोषणा 

नाना पटोले यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना पटोलेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना धंगेकर पक्ष सोडतील का? असा सवाल विचारला असता पटोले म्हणाले, राजकारणात काही लोक व्यावसायिक असतात. सत्ता जिथे असेल त्याबाजूने वागणारे काही लोक असतात. त्यामुळं यावर आज कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही. पण महाराष्ट्रात जनमत हे काँग्रेसच्या बाजूने आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या पापांमुळे जनतेच्या मतदानावर दरोडा टाकला गेलाय. सामान्य लोकांना कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार अपेक्षित आहे, त्यामुळं काय निर्णय घ्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार बुहमतात येईल, असं मला वाटतं.

नामदेव शास्त्री सीआयडीमध्ये आहेत की एलसीबीमध्ये?, मुंडेंना पाठींबा देताच बजरंग सोनवणेंचा खोचक सवाल 

यावेळी पटोले यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मी व्यक्तिगत कुणा एकाला बोलत नाही किंवा कुणाचेही नाव घेणार नाही. पण सत्तेवर आलेलं सरकार हे फसवणुकीतून आलेलं आहे, एवढंचं सांगेन असं पटोले म्हणाले.

धंगेकर काय म्हणाले?
धंगेकर म्हणाले, काल मी माझ्या वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंना भेटायला गेलो होतो. मी कायम विरोधात लढत आलोय. मात्र, माझी काही कामं अडतात. त्यामुळं मी त्यांच्याकडे जाऊन काही कामांचा पाठपुरावा करायला त्यांच्याकडे गेलो होतो. मी लढणार आहे. सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही, असं धंगेकर म्हणाले.

कोण आहेत रवींद्र धंगेकर?

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा येथून विद्यमान आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला. यानंतर त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही धंगेकर यांनी कसबा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत हेमंत रासने विजयी झाले.

 

follow us